सातारा:-पावसाने जादा झालेले पाण्याचे आवर्तन तातडीने धोम बलकडी कालव्याला सोडावे: अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पावसाने जादा झालेले पाण्याचे आवर्तन तातडीने धोम बलकडी कालव्याला सोडावे: अनिलकुमार कदम.
सातारा:- निरा धोम धरण क्षेत्रात जोरदार पाऊस चालू असून धरणे भरत आली आहेत पावसाने जादा झालेले पाण्याचे आवर्तन त्वरित तातडीने धोम बलकडी कालव्याला सोडावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.
सध्या खंडाळा फलटण दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशातील अवर्षणप्रवण क्षेत्रात पाऊस जेमतेम आहे.पावसाने जादा झालेले पाणी धोम बलकडी कालव्याला सोडले तर बाणगंगा धरण,धुमाळवाडी धरण, काटेवाडी पाझर,खंडोबाचा पाझर,इतर गावोगावी असलेले ९२ पाझर तलाव,५२८नालाबल्डींग, शेकडो शेततळी, गावागावांतील ओढे, नाले भरता येतील.पुढे पावसाचे प्रमाण कमी अथवा लांबला तर खंडाळा फलटण तालुक्यातील दक्षिणेकडील डोंगराळ भागात विशेषत: तांबवे सालपे हिंगणगाव आदकी बिबी वडगांव ताथवडा ढवळ वाखरी दालवडी उपळवे वेळोशी सावंतवाडी बोडकेवाडी जाधववाडा धुमाळवाडी निरगुडी सासकल विंचुर्णी मांडवखडक वडले मिरढे जावली आंदरुड या ८४ गांवाना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नक्कीच फायदा होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली आहे.
धोम बलकडी कालव्याला पावसाने अतिरिक्त झालेले पाणी दरवर्षी शेतकऱ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन सोडण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा व निर्णय घेण्यात यावा.यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी पावसाळ्यात अतिरिक्त होण्याची शक्यता असलेल्या पाण्याचे सुक्ष्म नियोजन करुन व्यवस्थापन केले तर खंडाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील व फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.यासाठी निरा व धोम धरण क्षेत्रातील प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पावसाळ्यात निरा धोम धरण लाभक्षेत्रातील पाण्याच्या गरजेचे सर्व्हेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी फलटण येथे निरा धोम धरण लाभक्षेत्रातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन नियोजन करावे अन्यथा लाख मोलाची पाण्याची संपत्ती दरवर्षी प्रमाणे वाया जाईल.धोम बलकवडी कालव्याला पावसाने अतिरिक्त झालेले पाणी तातडीने सोडले तर दोन तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना व जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा अनिलकुमार कदम यांनी व्यक्त केली आहे.