नीरा:-(पुरंदर)-निरा नदी पात्रात पाणी वाढलं दत्त मंदिराला पाण्याचा वेढा
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
निरा नदी पात्रात पाणी वाढलं दत्त मंदिराला पाण्याचा वेढा

निरा( ता. पुरंदर):- गेली दोन दिवसांत निरा धोम धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने निरा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.निरा दत्त घाटला निरा नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे.
जोरदार पाऊस पडत असल्यामुळे धोम धरण व निरा धरण क्षेत्रात पाणी साठा वाढत असून निरा नदीच्या काठावर वसलेले अनेक गावांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
दोन दिवसांपासून पडणारा पाऊस उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत.
ढगाळ वातावरणामुळे व सततच्या पावसामुळे निरा नदी काठावरील गावातील पिकें व भाजीपाला फळबागा यांचे मुळकुज खोडकुज अळी किटक हुमणी यामुळे ऊस मका यांसारख्या अनेक शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पावसाचे पाणी व नदी पात्रातील गढूळ पाणी यामुळे डासांची निर्मिती होवून साथीचे आजार होण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कामकाज सुरू करणे गरजेचे आहे.




