कराड:-श्री शिवाजी विद्यालय कराड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्री शिवाजी विद्यालय कराड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
कराड:- श्री शिवाजी विद्यालय कराड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन प्रमुख पाहुणे भारतीय सैन्य दलातील हवालदार श्री. सुनील बबन यादव तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे, ज्येष्ठ संचालक मा. श्री चंद्रकांत काशिनाथ हिंगमिरे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री शिवाजी विद्यालय कराडचे नूतन मुख्याध्यापक श्री.टी.डी. जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी भित्तिपत्रकाचे प्रकाशन, विद्यार्थी कवायत ,लेझीम, राष्ट्रभक्तीपर गीते मुख्याध्यापक व प्रमुख पाहुण्यांची मनोगते झाली. लेह- लडाख येथे कर्तव्य बजावणारे प्रमुख पाहुणे श्री. यादव यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थ्यांनी आहार, व्यायाम, अभ्यास ,याकडे लक्ष देऊन सुदृढ शारीरिक स्थिती ठेवण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक श्री जाधव टी.डी.सर यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ संदेशात देह आणि देव यांच्यामध्ये देश भावना श्रेष्ठ ठेवून वर्तन करण्याविषयीचे आवाहन केले. राष्ट्रीय ऐक्याची भावना जागृत ठेवण्यास सांगितले. विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.