आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
रहाटणी:-(खटाव)-भरत काका चेन्ने फौजी याचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भरत काका चेन्ने फौजी याचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.
मायणी प्रतिनिधीं——- रहाटणी ता. खटाव येथे मा.श्री भरत काका चन्ने ( फौजी ) यांचा सेवानिवृत्तीसमारंभ पुसेसावळी जि.प गटाचे युवा नेते मा.श्री विक्रमबाबा कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी बोलताना बाबांनी भरत चन्ने फौजी यांनी देशासाठी अविरतपणे 22 वर्ष केलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार व्यक्त केले आणि भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुसेसावळी जि. प गटाचे युवा नेते सुहास दादा पिसाळ, रहाटणी गावचे नेते बाळू आप्पा थोरात, मा.सरपंच संभाजी थोरात, सरपंच अनिल बुवा, नितीन काका कुलकर्णी, हरिश्चंद्र निकम, युवा नेते सागर थोरात, देविदास थोरात, शिवाजी थोरात, रघुवीर थोरात यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी,कुटुंबीय गावातील ग्रामस्थ, महिला व तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.