पारनेर:-पत्रकार सुरेश खोसे पाटील यांना राज्य सरपंच सेवा संघाचा ” उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार ” सन्मानपूर्वक प्रदान.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार सुरेश खोसे पाटील यांना राज्य सरपंच सेवा संघाचा ” उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार ” सन्मानपूर्वक प्रदान.

पारनेर -( राजकुमार इकडे) पत्रकारितेच्या लेखनीच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित समस्या , प्रकाशात आणून त्या सोडविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करणारे पत्रकार सुरेश खोसे पाटील यांच्या लेखनी चे महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाने कौतूक करत दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ” उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार ” श्री महंत डॉ . श्रीकांतदास धुमाळ यांच्या हस्ते व सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि यादवराव पावसे , प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ . सुधा कांकरिया , प्रसिद्ध हिशेब तपासणीस डॉ . शंकर अंदानी , प्रसिद्ध सिने अभिनेत्री रुचिरा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला .
पत्रकारांसाठी काम करत असलेला व त्यांना संघटीत पणे एकत्रित ठेवणारा देशातील सर्वांत मोठा असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव म्हणून कार्यरत असलेले व स्वतंत्र लेखनीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार व दैनिक पारनेर समर्थ चे संपादक म्हणून कार्यरत असलेले सुरेश काशिनाथ खोसे पाटील यांच्या पत्रकारितेची व पत्रकार क्षेत्रातील योगदानाची राज्यातील गाव प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या व संवाद सरपंचांशी गावच्या केंद्र बिंदूशी या तत्वाने काम असलेल्या राज्य स्तरीय सरपंच सेवा संघाने आपण हून दखल घेत त्यांना व पारनेर तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादिका सौ . निलम खोसे पाटील यांना राज्यस्तरीय ” उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार ” सन्मानपूर्वक देत त्यांचा फेटा बांधत , सन्मान पत्र , सन्मान चिन्ह देऊन शाब्दिक गौरवपुर्ण वातावरणात व प्रमुख पाहुण्यांच्या आणि राज्यातील सरपंचांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
[ चौकट –
मान नेतृत्वाचा , सन्मान पत्रकारितेतील कर्तृत्व व लेखनीचा ,
सुरेश खोसे पाटील हे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून परिसरातील गोरगरीब , जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे सामाजिक , पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले निस्वार्थी व्यक्तिमत्व असून पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसाला माणूसकी च्या नात्याने मदतीचा हात पुढे करून समाजात एक आदर्श निर्माण केला . ]




