सातारा नूतन तहसीलदार श्री. यादव यांची संविधानाची प्रत देऊन स्वागत..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा नूतन तहसीलदार श्री. यादव यांची संविधानाची प्रत देऊन स्वागत..
सातारा दि: सातारा तालुका तहसीलदार पदी श्री समीर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाची प्रत देऊन त्यांचे स्वागत केले.
गेली अडीच महिने सातारा तहसीलदार पद रिक्त होते. याबाबत साताऱ्यातील दैनिकाचे प्रतिनिधी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल महसूल विभागाने घेऊन तातडीने सातारा तहसीलदार पदी श्री यादव यांची निवड केली आहे. आज सातारा तहसीलदार बुधवार स्वीकारल्यानंतर प्रथमच सातारकरांच्या वतीने नूतन तहसीलदार श्री यादव यांना संविधानाची प्रत देऊन स्वागत केले. या वेळेला पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, विश्वास घोरपडे व बाबुराव चव्हाण उपस्थित होते.