मुंबई:-महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयका विरोधात आझाद मैदानात प्रचंड एल्गार.
पत्रकार प्रकाश गायकवाड नाशिक जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयका विरोधात आझाद मैदानात प्रचंड एल्गार.
विधेयक रद्द करा या मागणीसाठी आझाद मैदानात हजारोंचे धरणे.
माकप, भाकप, शेकाप, भाकप (माले) यांसह शिवसेना (उध्दव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), राष्ट्रीय कॉंग्रेस व अनेक पुरोगामी संघटना एकत्र.
जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती द्वारा दिनांक 30 जून 2025 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे हजारो जनसामान्यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राज्य सरकारचे जनविरोधी विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीसाठी प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रमुख उपस्थिती हुकूमशाहीच्या विरोधात संघर्षासाठी तयार असलेल्या जनतेची आणि विविध पक्ष संघटनांच्या नेतृत्वाची होती.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, भास्कर जाधव यांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शैलेंद्र कांबळे व डॉ. एस. के. रेगे, शेकापचे भाई जयंत पाटील व राजू कोरडे, भाकपचे डॉ. भालचंद्र कानगो, सुभाष लांडे व प्रकाश रेड्डी, राष्ट्रीय कॉंग्रेसचे धनंजय शिंदे, समाजवादी पक्षाचे राहुल गायकवाड व मेराज सिद्दिकी, भारत जोडो आंदोलनाच्या उल्का महाजन, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, फॉरवर्ड ब्लॉकचे किशोर कर्डक, भाकप (माले)चे उदय भट, श्रमिक मुक्ती दल (लोकशाही)चे धनाजी गौरव, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर व नासिर चौगुले, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेते व सीआयटीयूचे राज्य सचिव डॉ. विवेक मोन्टेरो, प्राध्यापक संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या ताप्ती मुखोपाध्याय, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या प्रिती शेखर, यांनी सरकारच्या संविधान विरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेत प्रस्तावित विधेयकाला कडवा विरोध दर्शविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्का महाजन यांनी तर सूत्रसंचालन शैलेंद्र कांबळे यांनी केले.
या विधेयकाविरोधात राज्यभर जनतेने रस्त्यावर उतरून विरोध करावा, त्यासाठी आपण सर्व एकत्र राहून भाजप-प्रणित सरकारची संविधानविरोधी धोरणे हाणून पाडू असा दृढ निश्चय यावेळी उपस्थित हजारो लोकांनी केला.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन