कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:- औंध घाटमाथा-महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त मा.श्री.शेखर गायकवाड साहेब यांची वर्धन ऍग्रो कारखान्यास सदिच्छा भेट.

प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव:-9503995968

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त मा.श्री.शेखर गायकवाड साहेब यांची वर्धन ऍग्रो कारखान्यास सदिच्छा भेट.

दि.14-10-22 वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त मा.श्री.शेखर गायकवाड साहेब यांनी वर्धन ऍग्रो कारखान्याला सहपरिवार सदिच्छा भेट देऊन कारखान्याची पाहणी केली. याप्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान चेअरमन धैर्यशीलदादा कदम, ज्येष्ठ संचालक भीमराव काका पाटील,कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम, संचालक सुदामबापू दिक्षित भीमराव डांगे आप्पा,यशवंत चव्हाण,सतीश सोलापूरे,माजी पं.स.सदस्य विकास राऊत यांचेवतीने करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. विक्रमबाबा कदम यांनी कारखान्याची संपूर्ण माहिती विशद केली रिशमिश सारख्या सल्फरलेस उत्पादनाला बाजारात असणारी मागणी अधोरेखित केली तर चेअरमन धैर्यशीलदादा कदम यांनी खांडसरी साखर कारखान्यांना साखर संघाचे सभासद करून घ्यावे जेणेकरून महाराष्ट्र शासनाची अशा कारखान्यांना आर्थिक मदत मिळून नवनवीन प्रोजेक्ट सुरू करता येतील अशी मागणी केली तसेच बगॅसपासून भविष्यात कागद तयार करण्याचा प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगितले.

मा.शेखर गायकवाड यावेळी म्हणाले खांडसरी साखर कारखाण्याना भरपूर अडचणी आहेत त्यासाठी राज्याचा प्रथम कायदा दुरुस्त करावा लागेल तशी प्रक्रिया सुरू असून पुढील 2-3 वर्षात खांडसरी साखर कारखान्यांना चांगले दिवस येणार आहेत इथेनॉलची निर्मितीकडे खांडसरी साखर कारखान्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे इथेनॉलवर चालणारे ट्रॅक्टर, स्ट्रोव्ह,गॅस शेगडी लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत 60-65 रुपये दराने इथेनॉल विक्री केल्याने या कारखान्यांना भरपूर आर्थिक फायदा होईल संपूर्ण जगात खांडसरी साखर व जागरी पावडरला भरपूर मागणी आहे यावर्षीचा महाराष्ट्रातील साखर धंदा 9 लाख मेट्रिक टनावरून 15 लाख मॅट्रिक टनावर गेला असून 1 कोटी टर्न ओव्हर साखर धंद्याने पूर्ण केला आहे त्यापैकी 42500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत वर्धन ऍग्रो कारखान्याला माझ्याकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल प्रशासकीय पातळी वरून जेवढी मदत शक्य असेल ती माझ्याकडून केली जाईल चेअरमन धैर्यशील दादांची साखर संघांचे सभासद मागणीबाबत मी सकारात्मक आहे. वर्धन ची पाहणी केल्यानंतर कारखान्याचे व्यवस्थापन बघून भविष्यात हा कारखाना साखर उद्योगासाठी एक रोल मॉडेल ठरेल याबाबत माझ्या मनात कसली शंका नाही.
या कार्यक्रमावेळी आभार वर्धन ऍग्रो कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिजीत डूबल यांनी मानले याप्रसंगी कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button