फलटण तालुक्यात शेतकरी मान्सून पुर्व मशागतीच्या कामाला वेग.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
फलटण तालुक्यात शेतकरी मान्सून पुर्व मशागतीच्या कामाला वेग.
फलटण:-
फलटण तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्वत्र गेली दोन दिवसांत वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे कोल्हापूर बंधारे नालाबल्डींग,तलाव यामध्ये थोडं पाणी साठा झाला आहे तर शेतजमिनी ओलावा निर्माण झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर फलटण तालुक्यातील शेतकरी वापशावर खरीप हंगामातील पिके लागवडीसाठी शेतीची मान्सूनचा पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेतीची मान्सून पुर्व शेती मशागतीची कामे नांगरणी,फणपाळी,पाळी घालणे यासाठी कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या घटली असून आता मोठ्या प्रमाणात टॅक्टरवर शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.यावर्षी नागरणी एकरी ३२००/- रुपये तर कल्टीवेटर २५००/- रुपये एकर, रोटोव्हेटर २५००/- रुपये एकरी, फणपाळी २२००/- रुपये एकरी दर आहेत. मशागतीची कामे करण्यासाठी वाढत्या दरामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे.शेती मशागत,बीयाणे,खते, औषधे यासाठी वाढत्या भरमसाठ दरवाढीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.खरीब हंगामासाठी शेतकऱ्यांना शासनाने एकरी १०,०००/- रुपये अनुदान द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.