कसबा:-(पुणे)-एक_कॉल_प्रॉब्लेम_सॉल्व्ह प्रभाग १७ मध्ये नागरिकांच्या अडचणींवर तातडीने उपाय! धडाडीचे नेतृत्व… जनतेचा विश्वास!
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
एक_कॉल_प्रॉब्लेम_सॉल्व्ह
प्रभाग १७ मध्ये नागरिकांच्या अडचणींवर तातडीने उपाय!
धडाडीचे नेतृत्व… जनतेचा विश्वास!
कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर मंगळवारी जनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत नानापेठ येथील हिंदमाता चौकात बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात येतात आणि तत्काळ निवारण केले जाते.
या जनसंपर्क उपक्रमाचे नेतृत्व आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, प्रभागातील नागरिकांना न्याय देण्याचा व लोकशाहीचा खरा अर्थ दाखवणारे हे कार्य अनेकांचे मन जिंकत आहे.
या बैठकीत प्रभाग क्रमांक १७ चे धडाडीचे अध्यक्ष सनीभाऊ पवार यांनी विशेष कार्यक्षमतेने नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेतले. त्यांनी संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधून काही समस्यांचे लगेच निवारण केले. त्यांच्या या तत्पर आणि सजग भूमिकेमुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे खुलेपणाने अभिनंदन केले.
“सनीभाऊ पवार प्रभागासाठी २४x७ कार्यरत असतात. त्यांच्यामुळे आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचतो,” असे अनेक नागरिकांनी सांगितले.
यावेळी मंचावर आमदार हेमंतभाऊ रासने, कसबा मंडळ अध्यक्ष राजेंद्रभाऊ काकडे, माजी नगरसेवक मनिषभाऊ साळुंखे, विशालभाऊ धनवडे, बाप्पू नाईक, राजेशभाऊ बारगुजे, सुरेंद्र ठाकूर, किशोर दांडेकर, अमर ईट्टम, राकेश चौधरी आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हे जनसंपर्क अभियान म्हणजे फक्त एक औपचारिकता नाही, तर प्रभागातील जनतेच्या हक्कांसाठी लढणारा एक खंबीर मंच आहे.