पुणे:-श्रीमंत शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने महाराणा प्रताप जयंती जल्लोषात साजरी.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीमंत शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने महाराणा प्रताप जयंती जल्लोषात साजरी.
पुणे – गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकात राष्ट्रगौरव वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 485 व्या जयंती श्रीमंत शिवगर्जना प्रतिष्ठान (वानवडी) यांच्या वतीने उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. मध्यरात्री ठीक 12 वाजता सर्व कार्यकर्ते एकत्र जमले आणि महाराणांच्या प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाराणाभक्त राजेंद्र पवार यांनी स्वतः रचलेली आणि लिहिलेली “महाराणा प्रताप गर्जना” सादर केली. त्यांच्या जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीने भारावून गेला. या घोषणांनी उपस्थितांमध्ये नवा जोम आणि प्रेरणा निर्माण केली.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्ते: सोहम चौधरी, सवाराम सोळंकी, गणेश चौधरी, हेमंत कुमावत, जितू सोळंकी, मंगेश चौधरी, प्रवीण चौधरी, भारत चौधरी, योगेश हांडे, चंद्रकांत यादगवार, सुशांत घोरपडे, सूरज सिरसाट, ऋत्विक राजपूत
या प्रेरणादायी कार्यक्रमातून महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाची आठवण ताजी झाली. त्यांचे विचार आणि शौर्य आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचे कार्य श्रीमंत शिवगर्जना प्रतिष्ठान यशस्वीपणे करत आहे.