मसूर:-(कराड):-कालगाव येथून पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान.
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील पुजारी कराड तालुका प्रतिनिधी
कालगाव येथून पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान.
मसूर: कालगाव, ता. कराड जि. सातारा येथून शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी कालगाव ते पंढरपूर श्री काळभैरव पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. तसेच यामध्ये वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहे.
काळभैरव दिंडी सोहळ्याचे हे 14 वे वर्ष असून, या सोहळ्यात तुकाईवाडी (ता. सातारा), नवीन कवठे (ता. कराड), चोपडी (ता. पाटण) इत्यादी दिंडीतील भाविक भक्त सहभागी होणार आहेत . ही दिंडी कालगाव, अंतवडी, चोराडे, मायणी, विभुतेवाडी, दिघंची, महुद, कोर्टी मार्गे हरिनामाचा गजर , प्रवचन, कीर्तन , गजर करत विठ्ठल नामाच्या जयघोषात 23 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे पोहचनार आहे , तर कालगाव येथे दिंडी सोहळ्याची सांगता काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने होणार आहे. दरम्यान पंढरपूर कडे जाणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्यात कालगावसह इतर परिसरातील भाविक भक्तांनी सहभागी व्हावे ही विनंती…!
आयोजक: श्री कालभैरव ग्रामस्थ भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, कालगाव आणि इतर वारकरी भक्त..!