क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगाव:-नागरिकांच्या व सुरक्षा कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर पकडण्यात यश.

प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

लोहगाव वार्ताहर
राहाता तालुक्यातील प्रवरानगर  पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना
येथील कामगार सांस्कृत भवन समोरील कारखाना वसातीमध्ये नागरिकांच्या सतर्क मुळे दरोडा घालणाऱ्यांचा प्रयत्न फसला
 याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रवरनगर  वसाहतीमध्ये उस संशोधन शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश थोरात हे राहात असून मंगळवारी रात्री एक च्या सुमारास यांच्या निवासस्थानाजवळ आलेल्या दरोडेखोरांनी  त्यांच्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना थोरात कुटुंब जागी झाले दरवाजेचा तोडण्याचा आवाज येतात त्यांनी कारखाना सुरक्षा विभागात फोन करून या घटनेबाबत संपर्क केला असता सुरक्षा कर्मचारी व मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांनी लगेच लोणी पोलीस स्टेशन संपर्क करून सदर घटनेबाबत माहिती दिली
 सुरक्षा  अधिकारी नंदकुमार डेंगळे  व त्यांचे सहकारी व गोडाऊन कॉन्ट्रॅक्टर संतोष जायभाय व त्यांचे कर्मचारी दादा खाडे गोल्हार हे कर्मचारी  डॉक्टर योगेश थोरात यांच्या निवासस्थानी जवळ पोहचताच  कोणीतरी आल्याची  कल्पना येतात दरोडेखोर तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला  परंतु दोन दरोडेखोर पकडण्यात येथील नागरिकांना  व सुरक्षा रक्षकास यश  आले बाकीचे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले .  दोन दरोडेखोरांना नागरिकांनी व सुरक्षा कर्मचारी यांनी लोणी पोलीस स्टेशनचे यांच्या ताब्यात देण्यात आले
 डॉक्टर योगेश थोरात हे वेळेस सावध झाल्यामुळे दरोडेखोरांचा प्रयत्न फसला  सहा दरोडेखोरंपैकी दोन जण    पकडण्यात सुरक्षा विभागाच्या  कर्मचाऱ्यांना व नागरिकांना यश आले  आत्तापर्यंत  लोणी  पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी दरोडे चोऱ्या  झाल्या परंतु त्याचा अद्याप कुठलाही तपास लागलेला नाही
 नागरिकांच्या  व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोर हाती लागले याबद्दल परिसरातील नागरिकांनी सदर नागरिकांचे व     सुरक्षारक्षकाचे  कौतुक केले आहे
शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button