पुणे:-गोकुळ नगर पठार वारजे माळवाडी येथे पत्र्याच्या शेडमध्ये झालेल्या भीषण आग आणि सिलेंडरच्या स्फोटामध्ये दोघा बाप लेकांचा होरपळून मृत्यू.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पुणे दिनांक 9
गोकुळ नगर पठार वारजे माळवाडी येथे पत्र्याच्या शेडमध्ये झालेल्या भीषण आग आणि सिलेंडरच्या स्फोटामध्ये दोघा बाप लेकांचा होरपळून मृत्यू.
रात्री दोन च्या सुमारास या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली ही आग एवढी भीषण होती की या दोघांना घराच्या बाहेर देखील पडता आलं नाही. आणि घरामध्ये सिलेंडर असल्यामुळे आजीने तो सिलेंडर फुटला आणि ह्या दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. हा आवाज एवढा भयंकर होता शेजारीपाजारी सगळे जागे झाले आणि त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत खूप वेळ झाली होती ते दोघं जळून खाक झाले होते. शेजारी राहणाऱ्या लोकांना या आगीची झळ पोचली पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे मोहन माणिक चव्हाण व 43 आणि मुलगा अतिश मोहन चव्हाण वय 25 हे तेलंगणा राज्यातील तादुर या गावचे रहिवासी होते परंतु काम धंदा निमित्त ही लोक पुण्यात वारजे मध्ये गोकुळ नगर पठार या ठिकाणी राहत होती. गोकुळ नगर या ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे. ही बातमी वारजे अग्निशामक दलाला कळवण्यात आली आणि तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांनी ती आग विझवली. घरामध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही सगळं जळून खाक झालं सिलेंडरचे अक्षरश तुकडे झाले.
याच्यामध्ये स्थानिकांनीही खूप मदत केली. शेजारीपाजारी लोकांनी ही खूप मदत केली परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक दुःख जाणवत होतं.