कराड:-“गुरुजन ग्रुप” आणे यांचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
“गुरुजन ग्रुप” आणे यांचे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
आणे, कराड
आणे येथील शिक्षकांच्या वतीने प्रत्येक वर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला जातो. नुकताच आठवी NMMS परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गावातील दोन विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. चि.वेदांत संभाजी पाटील आणि चि. वेदांत विकास देसाई यांनी अनुक्रमे जिल्हा गुणवत्ता यादीत 35 वा व 44 वा क्रमांक प्राप्त केला हे दोन्ही विद्यार्थी आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 12000/- रुपये शिष्यवृत्ती सलग चार वर्षे मिळणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी परीक्षेत 85% च्या वरती गुण प्राप्त करतात, आठवी स्कॉलरशिप, NMMS परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त करतात त्यांचा त्यांच्या घरी जाऊन पालकांच्या समवेत सत्कार केला जातो. यातून त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा या पाठीमागील हेतू असतो. तसेच जे गरीब, होतकरू हुशार विद्यार्थी असतात त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही केली जाते. हा उपक्रम गेल्या सात वर्षापासून राबविण्यात येत आहे. यामध्ये आजी-माजी शिक्षक एकत्र येऊन गुरुजन ग्रुप हा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुप मध्ये सन्मा. आत्माराम देसाई, बाळासाहेब देसाई, शंकर देसाई, रमेश सुतार, दिनकर पाटील, आनंदराव पाटील, विकास देसाई, निवास देसाई हे गुरुजन या ग्रुपमध्ये आहेत. आनंदराव पाटील हे या ग्रुपचे सचिव आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गावातील ग्रामस्थांच्या वतीने नेहमीच कौतुक होत असते. तसेच गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कार्यामध्ये सुद्धा या ग्रुपच्या वतीनेआर्थिक मदत केली जाते.