सातारा औद्योगिक वसाहतीत मंत्र्यांच्या स्वागतासाठी खोट्या नोटांचा पाऊस.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा औद्योगिक वसाहतीत मंत्र्यांच्या स्वागतासाठी खोट्या नोटांचा पाऊस.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत उद्योगमंत्र्यांच्या स्वागतासाठी खोट्या नोटांचा पाऊस पाडण्यात आला. या खोट्या नोटांवर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचे चित्र आहे. या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या स्वागतासाठी रंगबेरंगी कागदासह व साची स्तूपाची चित्र असलेल्या दोनशे रुपयांच्या भारतीय बच्चो का बँक असे छापलेल्या नोटा उडवण्यात आल्या. सदर नोटा स्वागतानंतर जमिनीवर विसावल्या होत्या. गांधीजी यामुळे परिसरातील गांधीवादी व गांधी विचारसरणीला मानणाऱ्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत च्या स्वागतासाठी कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी घेण्यात आली असतानाच युगपुरुषांचा आव्हान झाला आहे. वास्तविक पाहता सध्या युगपुरुषांच्या विचार व त्यांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे संविधानाच्या माध्यमातून शपथ घेऊन सरकार स्थापन करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने भावनेच्या भरात युगपुरुषांचा अवमान होत असेल तर तो सातारा जिल्हा कधीही खपवून घेणार नाही. सातारा जिल्हा औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक अडीअडचणी सोडवण्यासाठी सातारचे खासदार व मंत्री महोदय हे कटिबद्ध आहेत. त्याचबरोबर उद्योग मंत्र्यांनीही उद्योजकांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना सुचवले आहेत. याचा सर्वांनाच आनंद आहे. परंतु स्वागता निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व सांची स्तूपाचा झालेला अवमान याबाबत आता कडक कारवाई व्हावी अशी मागणी गांधीवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे.
महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचे चित्र असलेल्या खोट्या नोटांचा वापर करून उद्योगमंत्र्यांचे स्वागत करणे, हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. या घटनेमुळे महात्मा गांधी आणि भारतीय संस्कृतीचा अवमान झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी होत आहे.
या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तसेच या प्रकरणी दोषींचा शोध घेतला जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
___________________________________
फोटो- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या दारात पडलेला नोटा