वाई:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाई नगरपालिका शाळा क्रमांक 7 या शाळेला माजी विध्यार्थी उमेश दादा खामकर यांच्याकडून 32 इंची LG टीव्ही भेट.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाई नगरपालिका शाळा क्रमांक 7 या शाळेला माजी विध्यार्थी उमेश दादा खामकर यांच्याकडून 32 इंची LG टीव्ही भेट.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाई नगरपालिका शाळा क्रमांक 7 या शाळेला आज शाळेचे माजी विद्यार्थी फुले नगरचे प्रगतशील शेतकरी आदरणीय श्री उमेश दादा खामकर यांनी शाळेसाठी 32 उंची LG स्मार्ट टीव्ही भेट म्हणून दिला. उमेश दादा खामकर यांच्या मातोश्री वंदना खामकर यांच्या हस्ते हा टीव्ही नगरपालिका शाळा क्रमांक 7 ला देण्यात आला. यावेळेस नगरपालिका शाळा क्रमांक9 चे मुख्याध्यापक श्री सुरेश दुधाने सर, तसेच नगरपालिका शाळा क्रमांक 3 चे निवृत्त मुख्याध्यापक श्री रियाज पटेल सर, एसएमसी अध्यक्ष सौ. यशोदा हिपळे, श्री रंगनाथ जमदाडे, श्री सचिन जमदाडे तसेच नवनियुक्त शिक्षक श्री आशिष कांबळे सर उपस्थित होते. सर्वांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिलेल्या भेट वस्तूचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी नक्कीच उपयोग होईल.मुलांना शाळेत टीव्ही आणि आलेले सर्व मान्यवर पाहून खूपच आनंद झाला.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री लक्ष्मण बाबासाहेब हुंबरे यांनी सर्वांचे आभार मानले.