कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जावळी:-गरजेपोटी कर्जासाठी मुलांनी भरलेल्या रिटर्नचा फटका वृद्ध आई- वडिलांना का? – विलासबाबा जवळ.

पत्रकार अमोल चोरगे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

जावळी:-गरजेपोटी कर्जासाठी मुलांनी भरलेल्या रिटर्नचा फटका वृद्ध आई- वडिलांना का? – विलासबाबा जवळ.

जावळीत रेशनचे धान्य बंद; दुष्काळाने होरपळलेल्या कुटुंबांनी जगायचे कसे?

प्रतिनिधी :

जावळी तालुक्यात रेशन धान्य वितरणाबाबत एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरल्याच्या कारणावरून काही कुटुंबांचे रेशन धान्य बंद केले जात असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, अनेक कुटुंबांतील मुले नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहतात. घरगुती गरजा भागविण्यासाठी, आर्थिक अडचणीच्या काळात बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहेत. मात्र, या रिटर्नचा संबंध गावी राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांच्या रेशन धान्याशी जोडला जात असल्याने त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

शहरात राहणाऱ्या मुलांनी गरजेपोटी कर्जासाठी रिटर्न भरले म्हणून गावी राहणाऱ्या वयोवृद्ध आई-वडिलांनी उपासमारीचा सामना करायचा का? मुलांनी आर्थिक व्यवहारासाठी भरलेल्या कागदपत्रांची शिक्षा वृद्ध पालकांना का मिळावी? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे जावळी तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाने आधीच होरपळून निघाला आहे. शेतीचे उत्पन्न घटले आहे, रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अत्यंत कठीण झाला आहे. अशा परिस्थितीत स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे हक्काचे धान्यही बंद झाल्यास या कुटुंबांनी जगायचे कसे?
शासनाने रेशन लाभार्थ्यांची पात्रता तपासावी, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, केवळ कुटुंबातील एखाद्या सदस्याने कर्जासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरले म्हणून संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती न तपासता वृद्ध आई- वडिलांचे धान्य बंद करणे योग्य आहे का, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
पुरवठा विभागाने अशा प्रकरणांची प्रत्यक्ष चौकशी करून स्वतंत्रपणे पात्रता तपासावी. गावी वास्तव्यास असलेल्या गरजू वृद्ध आई-वडिलांना अन्नधान्यापासून वंचित ठेवू नये. तसेच रेशन बंद करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांना स्पष्ट कारण आणि सुनावणीची संधी द्यावी.
शासनाच्या नियमांचा आदर आहे; परंतु नियमांची अंमलबजावणी करताना माणुसकीही जपली गेली पाहिजे. दुष्काळाने आधीच खचलेल्या ग्रामीण कुटुंबांच्या ताटातील घास हिरावून घेऊ नका, हीच प्रशासनाकडे अपेक्षा!
दुष्काळात होरपळलेल्या वृद्धांच्या ताटातील धान्य तरी हिरावून घेऊ नका अशी मागणी आम्ही जावळीकर चळवळीच्या वतीने करण्यात येत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button