ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-विखे-थोरात यांची राजकीय समीकरणे, राहुल शिंदे यांना मिळालेले पाठबळ आणि त्यासमोर खासदार नीलेश लंके यांनी मिळवलेला विजय, एक मंत्री, दोन माजी खासदार, आठ आजी-माजी आमदार… तरीही खासदार

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पारनेर:-विखे-थोरात यांची राजकीय समीकरणे, राहुल शिंदे यांना मिळालेले पाठबळ आणि त्यासमोर खासदार नीलेश लंके यांनी मिळवलेला विजय,
एक मंत्री, दोन माजी खासदार, आठ आजी-माजी आमदार… तरीही खासदार

निलेश लंके यांची बाजी!
विखे-थोरातांच्या राजकीय एकजुटीला पारनेरमध्ये धक्का; मोठ्या राजकीय ताकदीसमोर लंके यांचा विजय.

(सुपा, पारनेर -राजकुमार इकडे)

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पारनेर विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण १०४ मतांपैकी लंके यांना ६४ मते मिळाली, तर राहुल शिंदे यांना ४० मते मिळाली. लंके यांनी २४ मतांनी विजय मिळवला.
या निवडणुकीची खरी राजकीय पार्श्वभूमी पाहता, एका बाजूला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दोन खासदार आणि आठ आजी-माजी आमदारांची ताकद होती. विखे-थोरात यांची राजकीय हातमिळवणी आणि राहुल शिंदे यांना मिळालेले पाठबळ यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
मात्र एवढ्या मोठ्या राजकीय शक्तीसमोर खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळवत विरोधकांच्या राजकीय गणिताला धक्का दिला. राजकीय समीकरणे जुळवताना दुखावले गेलेले घटक अखेर लंके यांच्या नेतृत्वाकडे वळले का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
नेत्यांची ताकद मोठी असली तरी मतदारांचा कौल त्याहून मोठा असतो, हेच पारनेरच्या निकालाने दाखवून दिले!

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button