नागठाणेच्या शिरपेचात मानाचा तुरा! सरपंच डॉ. सौ.रूपाली ताई बेंद्रे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणेच्या शिरपेचात मानाचा तुरा! सरपंच डॉ. सौ.रूपाली ताई बेंद्रे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान.

सातारा : नागठाणे नगरीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. रूपाली ताई बेंद्रे यांना दैनिक प्रभात आयोजित ‘ आदर्श सरपंच पुरस्कार भारतीय जनता पार्टीचे बांधकाम मंत्री ना.मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. शाहू कलामंदिर, सातारा येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सरपंचांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे.
यावेळी दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे, संपादक श्रीकांत कात्रे, हिंदुस्तान फिड्सचे अनंत कुलकर्णी, डॉ. ओंकार जोगळेकर, कूपरचे नितीन देशपांडे, डॉ.सुजित बेंद्रे,पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री.संतोष साळुंखे पाटील, नागठाणे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री.हणमंत साळुंखे, सदस्य सौ.उषा संजय साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.




