आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वर:-तपोवन बौद्ध विहार येथे संविधान दिनाच्या नियोजनासाठी सहविचार सभा.

पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर प्रतिनिधी : उत्तम भालेराव
दिनांक : २ नोव्हेंबर २०२६

महाबळेश्वर:-तपोवन बौद्ध विहार येथे संविधान दिनाच्या नियोजनासाठी सहविचार सभा.

वानवली : भारतीय बौद्ध महासभा, तालुका महाबळेश्वर अंतर्गत शाखा क्रमांक तीनच्या वतीने तपोवन बौद्ध विहार, वानवली येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्त नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीची सुरुवात त्रिशरण पंचशीला घेऊन महामानवांना वंदन करून करण्यात आली.
या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष एकनाथ भालेराव, अभिजित भालेराव, विजय सपकाळ, आनंद सपकाळ, आनंद खरात, रवींद्र भालेराव, बबन जाधव, भीम क्रांती युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, संदीप भालेराव, शाखा क्रमांक तीनचे अध्यक्ष सुभाष जाधव, सचिव कोंडीबा कदम, रत्नकांत भालेराव, विठ्ठल भालेराव, शिवराम सपकाळ, संतोष सपकाळ, सुनील गमले,प्रकाश कांबळे, सुरेश तांबे, आनंद जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्धार
बैठकीत भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि जनजागृती याबाबत चर्चा करण्यात आली. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button