क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बामणोली:-मुनावळे जलपर्यटन प्रकल्प गुणी बाळाच्या ठेकेदारीने अडचणीत -सुशांत मोरे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

मुनावळे जलपर्यटन प्रकल्प गुणी बाळाच्या ठेकेदारीने अडचणीत -सुशांत मोरे

बामणोली दि:

महाराष्ट्र राज्यातील जावळी खोऱ्यात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर मुनावळे ता. जावळी या ठिकाणी १०.११ हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प विकसित केले आहे. मात्र शासनाच्या विविध विभागांच्या लेखी परवानगी पूर्वीच गुणी बळ ठेकेदारांनी ठेका घेतला. आता हा प्रकल्प रखडला आहे. निविदा प्रक्रियेची चौकशी करून ती तात्काळ रद्द करावी अन्यथा २ एप्रिलला कोयना जलाशयात जलसमाधी घ्यावी लागेल असा इशारा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
अत्यंत महत्त्वकांक्षी व पर्यटनाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यामध्ये अपयश आले असून या प्रकल्पाची भ्रूणहत्या होईल की काय ?अशी शंका घेतली जात आहे.

मौजे मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स म्हणून जाहीर केले आहे. त्यातच प्रकल्पाचे ठिकाण हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्राच्या सीमेपासून १ किमी. अंतरामध्ये असल्याने कायद्याने या ठिकाणी कोणताही पर्यटन प्रकल्प राबवता येत नाही. असे स्पष्ट आदेश आहेत. पर्यटन प्रकल्प राबवताना वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या ना-हरकत परवानग्या मिळविणे बंधनकारक आहे. सद्यःस्थितीत कोणत्याही विभागाची परवानगी मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत मोरे यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नयेत, असे लेखी आदेश मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांना दिले आहेत. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्रकल्प परिसरात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या दोन जागतिक वारसा स्थळांचा समावेश तसेच राखीव व संरक्षित संवेदनशील वनक्षेत्रे वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग या परिसरात आहेत. नियोजित प्रकल्पात मोठ्या प्रमाणात बांधकामे होणार आहेत. यामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होऊन प्रदूषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान पर्यटनमंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई काय निर्णय घेणार? याकडे पर्यटक प्रेमींचे लक्ष लागले आहे.

जलपर्यटन व पायाभूत सुविधां मुनावळे परिसरात देण्यासाठी
विविध बोटी खरेदी, क्षेत्रीय कार्यालयाचे बांधकाम, जलपर्यटनाच्या प्रेक्षागॅलरीचे बांधकाम, उपहारगृहाचे बांधकाम, जलपर्यटनाच्या तिकीट आरक्षण कक्षाचे बांधकाम, जलपर्यटन केंद्रासाठी सुरक्षा चौकीचे बांधकाम, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था बांधकाम, बोटिंग क्लबचे बांधकाम, बोट धक्क्याचे बांधकाम, प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्प क्षेत्राचा DGPS सर्वेक्षण करणे, प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. यासाठी लेखी परवानगी आवश्यक आहे.
भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, भारतीय वन कायदा १९२७, पर्यावरण संवर्धन कायदा १९८६, तिन्ही कायद्यांमधील विविध संवेदनशील तरतुदी लक्षात घेऊन पर्यावरणीय ऱ्हासाचे व जैवविविधता विनाशाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे
गुणी बाळ ठेकेदारासाठी मुनावळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया राबवली असल्याचा आरोप केला जात आहे.
मुनावळे याठिकाणी वॉटर स्पोर्ट सुरू करण्याकरिता साताऱ्यातील एका खासगी एजन्सीच्या नावावर कार्यारंभ आदेश जाहीर झाला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळण्यापूर्वीच श्री. मोरे यांचा तक्रार अर्ज प्रलंबित होता. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून पर्यावरणीय, वन्यजीव तरतुदींचा भंग करून निविदेला तांत्रिक मंजुरी देणारे जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कोयना सिंचनचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांच्या निलंबनाची मागणीही श्री. मोरे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात वाल्मिकी कराडमुळे मंत्रिपद धोक्यात आले असतानाच सातारा जावळीमध्ये आता दुधाने तोंड भाजले तर ताक फेकून पिण्याचा सल्ला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

________________________________
मुनावळे तालुका जावळी येथील पर्यटनाच्या नावाने गुणीबाळ ठेकेदाराचे स्वप्न बंगले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button