कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात निलंबित मुद्रांक विक्रेत्यांसाठी प्रशासनातील काही वाल्मिकी पाठीशी ?

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

साताऱ्यात निलंबित मुद्रांक विक्रेत्यांसाठी प्रशासनातील काही वाल्मिकी पाठीशी ?

सातारा दि
शासनमान्य परवाने देऊन मुद्रांक विक्री केली जाते. परंतु साताऱ्यामध्ये राजकीय नेत्यांचे नाव घेऊन अनेक जण महसूल कार्यालयात थांबून सामान्यांची लूट करत आहे .आता तर अशा निलंबित मुद्रा विक्रेत्यांच्या पाठीशी महसूल विभागातील काही वाल्मिकी कराड प्रवृत्ती प्रयत्न करत असल्याची मोठ्या आवाजात चर्चा रंगू लागलेली आहे.
दरम्यान, निलंबित मुद्रांक विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे सलग दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याकडे कायदेशीर बाजू असतानाही ते कारवाईची याचिका करत आहे. ही लोकशाही नसून प्रशासनातील वाल्मिकी कराडची ताकद आहे. अशी आता सामान्यांची खात्री पटलेली आहे.
सातारा तहसील , प्रांत कार्यालय व जिल्हा सहनिबंधक कार्यालयासमोरील पत्र्याचे शेड मुळातच अनाधिकृत आहे. अशा प्रकारे शासकीय जागेमध्ये स्वतःच्या लाभासाठी पत्र्याचे शेड मारणे आणि त्याला प्रायोजक भेटणे. हीच मोठी धक्कादायक बाब आहे. पण, गोट्यातील जनावरच जर चाऱ्यासोबत शेण खात असेल. तर कारवाई तरी कशी होणार ? अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी खंत व्यक्त केले आहे.
युट्युब वाहिनीचे पत्रकारावर माण खटाव तालुक्यात गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली आहे. तरीसुद्धा साताऱ्यातील पत्रकार संघटना मौन धारण करत आहे . जे पत्रकारांना न्याय देऊ शकत नाहीत ते सामान्य न्याय देऊ शकणार नाहीत अशी त्यांनी शंका उपस्थित केली.असा प्रकार फक्त सातारा जिल्ह्यातच पाहण्यास मिळत आहे . अशी खंत भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष व सत्ताधारी मंत्र्याचे समर्थक अरुण पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
सध्या आंदोलनकर्त्यांवर मानसिक दबाव आणण्यासाठी पोलीस वर्दीच्या अधिकाराचा वापर केल्याचे उघड झालेले आहे. परंतु, कार्यकर्त्यांनी आता लोकशाही वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केलेला आहे. सातारा जिल्हा प्रशासनामध्ये त्यापूर्वी नावलौकिक प्राप्त जिल्हाधिकारी अरुण भाटिया, एम रामास्वामी, सुबराव पाटील यांनी केलेल्या कार्याची आजही आठवण काढली जाते. त्याचबरोबर सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शहीद अशोक कामटे ,मीरा बोरवणकर, के एम एम प्रसन्ना, संदीप पाटील यांची कारकीर्द आजही स्मरणात आहे. आता हा इतिहास झालेला असून वर्तमान काळ फारच भयानक आहे. त्याचे पुढे भविष्यकाळ तर चिंताग्रस्त बनला आहे. न्याय न मिळाल्याने आंदोलकांची संख्या वाढू लागलेली आहे.
अशावेळी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकजुटीने याबाबत आवाज उठवावा. सातारा जिल्ह्यात अनाधिकृत बांधकाम ,अनाधिकृत व्यवसाय यासाठी राजकीय बळ अधिक वाढल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन नेते संजय गाडे, विशाल कांबळे, चंद्रकांत दादा कांबळे ,मिलिंद कांबळे व शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय गाडे, वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिसे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रमेश उबाळे, विशाल भोसले, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया एक गटाचे राजेंद्र ओव्हाळ, मदन खंकाळ, व उमेश चव्हाण, वैभव गवळी, सुधाकर काकडे, विशाल मोरे आणि व्यक्तिगत प्रश्न घेऊन अनेक जण आंदोलन करतात तर काहींना पाठिंबा देतात .
आता या साताऱ्यातील निलंबित मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली तर नवल वाटणार नाही असं आंदोलकांनी सांगितले. ज्या अधिकाऱ्यांनी शासकीय कामात कुचराई केलेले आहे. त्यांच्या सेवा पुस्तिके मध्ये अशा प्रकारे नोंद करावी. तसेच ज्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे त्यांना वेतन वाढ व पदोन्नती द्यावी यालाही दुजोरा दिला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

___________________________________
फोटो सातारा जिल्हाधकारी कार्यालय समोर आंदोलनासाठी बसलेले आंदोलन (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button