वाई दि.9 व्यक्तिमत्व विकासासाठी जीवन कौशल्ये अंगिकारणे गरजेचे प्रियांका शर्मा यांचे प्रतिपादन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि.9 व्यक्तिमत्व विकासासाठी जीवन कौशल्ये अंगिकारणे गरजेचे प्रियांका शर्मा यांचे प्रतिपादन.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय वाई, मध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, कौशल्ये व व्यवसाय शिक्षण केंद्र, महिला सबलीकरण कक्ष आणि नांदी फाउंडेशन, महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पाच दिवसीय जीवन कौशल्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा महिंद्रा प्राईड क्लासरूम पुणे यांच्या केंद्रीय प्रमुख सौ. सीमा भागवत व राज्य समन्वयक श्री. पंकज दांडगे यांच्या समन्वयाने कार्यशाळा संपन्न होत आहे. या कार्यशाळेसाठी अंतिम वर्षाच्या ६० विद्यार्थीनी विविध कौशल्ये आत्मसात करत आहेत. प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्व विकासाबरोबर जीवन कौशल्ये अंगिकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नांदी फाउंडेशन, पुणे संस्थेच्या प्रशिक्षक प्रियांका शर्मा यांनी केले.
प्रियांका शर्मा आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्तीचे सामर्थ्य, सौंदर्य व संपन्नता, आत्मविश्वास, कार्यक्षमता, स्मरणशक्ती, संभाषण, नेतृत्व, वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, धेयनिष्ठा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा इत्यादी प्रकारे व्यक्तिमत्व विकास साधता येतो. स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा कार्यशाळेतून कौशल्ये सुधारण्याची संधी प्राप्त होते असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते.
प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थीनीनी स्पर्धेच्या युगात यश प्राप्तीसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतः मध्ये बदल घडवावा यासाठी स्वतः व्यक्तिमत्व विकास साधणे अनिर्वाय आहे विद्यार्थ्यानी आलेली संधी स्वीकारून त्यात प्रगती करावी व संधीचा शोध घ्यावा असे मत व्यक्त केले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रुती यादव व चंद्रिका साबळे यांनी केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. रामदास बोलके व पाहुण्यांची ओळख डॉ. मंजुषा इंगवले यांनी करून दिली कार्यशाळेचे आभार प्रा. (डॉ.) विनोद वीर उपप्राचार्य वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांनी केले. याप्रसंगी प्रा. दिपाली चव्हाण, प्रा. दिपाली पाटील, प्रा. संदीप पातुगडे, प्रा. जयवंत पवार, श्री. रविंद्र जमदाडे आदि शिक्षक उपस्थित होते.