अमरावती:-हिंदूंनी चार मुले करावीत!” नवनीत राणांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ.
पत्रकार प्रमोद काळे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हिंदूंनी चार मुले करावीत!” नवनीत राणांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ.

अमरावती भाजप नेत्या आणि खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या “हिंदूंनी चार मुले करावीत” या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोकसंख्या संतुलनाचा मुद्दा मांडताना केलेल्या या विधानामुळे केवळ राजकीयच नव्हे, तर संविधानिक जबाबदारीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर जोरदार टीका करत, संविधानिक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींनी समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करणे कितपत योग्य आहे? असा थेट सवाल उपस्थित केला आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या आणि बंधुतेच्या मूल्यांना असे वक्तव्य धरून आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या प्रकरणावरून काही राजकीय पक्षांनी नवनीत राणांनी स्पष्टीकरण द्यावे किंवा जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आह अशा वक्तव्यांमुळे समाजात ध्रुवीकरण वाढण्याचा धोका असल्याचा इश मात्र, लोकसंख्या नियंत्रण, धर्म आणि संविधानिक मूल्ये या तिन्ही मुद्द्यांवरून सुरू झालेला वाद आता राज्यव्यापी चर्चेचा विषय ठरत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, लोकप्रतिनिधींच्या भाषेची मर्यादा आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.




