ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कणकवली:-तळेरेत विवाहितेची आत्महत्या.

पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

तळेरेत विवाहितेची आत्महत्या.

कणकवली : तळेरे-दत्तनगर येथील विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास घेत आत्महत्या केली. दुर्गा देवेंद्र खटावकर (२९, रा. तळेरे-दत्तनगर) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेरे-दत्तनगर येथे मयत दुर्गा ही पती, सासू, सासरे, दीर, मुलांसोबत राहत होती. गुरुवारी सकाळी तिचे पती, सासरे हे हॉटेलमध्ये गेले होते तर कामानिमित्त दीर, सासू कोल्हापूर येथे गेल्या होत्या. दोन्ही मुली घरात होत्या. बुधवारी सकाळच्या सुमारास दुर्गा या घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गेल्या. त्याठिकाणी दुर्गा हिने गळफास घेत जीवन संपविले. हा प्रकार दुर्गा हिची मुलगी सानी हिच्या लक्षात आल्यानंतर तिने आजोबा रंजन खटावकर यांना फोन करून आईने गळफास घेतल्याचे सांगितले. या घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. याबाबत रंजन खटावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार घटनेची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करीत आहेत. दुर्गा यांच्या पश्चात पती, दोन मुली, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे.
……….
मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
कणकवली : तालुक्‍यातील फोंडाघाट येथे काल (ता.२४) दुपारी हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी चौघा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल तुकाराम लाड (वय ४१, रा.फोंडाघाट कुळाचीवाडी) यांनी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, ते काल (ता.२४) दुपारी २.४० च्या दरम्‍याने फोंडाघाट बसस्थानक येथून दुचाकीने आपल्‍या घरी कुळाची वाडी येथे जात होतो. दुचाकीसह बाजारपेठेतील रोशन पारकर यांच्या घरासमोर आलो असता संतोष पारकर याने चालू गाडीवर माझ्या पाठीमागून पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात आपण दुचाकीसह रस्त्यावर पडलो. त्‍यानंतर संतोष पारकर, रोशन पारकर, त्‍याची आई प्रतिभा हे तेथे आले. या तिघांनी माझे शर्ट काढून पाठीवर फायर पाईपने मारून दुखापत केली. तर रोशन याची पत्‍नी श्रृती याने तेथे येऊन याला मारा असे प्रोत्‍साहन दिले. या मारहाणीत आपल्‍या हाताच्या दंडावर, पाठीवर, छातीवर आणि डोळ्याच्या खाली दुखापती झाल्‍या आहेत. श्री.लाड यांच्या फिर्यादीनुसार संतोष पारकर, प्रतिभा पारकर, रोशन पारकर आणि श्रृती पारकर यांच्या विरोधात मारहाण केल्‍याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button