ताज्या घडामोडी

संगमनगर:-साताऱ्यात लुटमार प्रकरणी दोन अल्पवयीन मुलासह एकास पोलिसांनी घेतलं ताब्यात.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

साताऱ्यात लुटमार प्रकरणी दोन अल्पवयीन मुलासह एकास पोलिसांनी घेतलं ताब्यात.

संगमनगर दि: सातारा शहर हे पेन्शनरचे गाव होते. आता त्याचा खूप मोठा विस्तार झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी लिफ्ट मागणारे एका परप्रांतीय मुलाला दोन अल्पवयीन मुलासह एका आरोपीने लुटण्याचा प्रकार केला. परंतु, पोलिसांनी आरोपी जीवन महादेव गायकवाड वय वीस वर्ष राहणार प्रतापसिंह नगर व दोन अर्पण मुलांना ताब्यात घेतले.
सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सातारा शहरामधील शिवराज पेट्रोलपंप ( संभाजीनगर ) येथे रात्रीचे वेळी एक इसम दुध प्रोडक्टचे मार्कटिंग करून पुणे येथून बेळगाव करिता जात होता . सातारा येथे खाजगी
वाहनाने उतरला होता. पुढे सातारा बस स्थानकाकडे जाण्यासाठी तो थांबला होता. सातारा येथून दुस-या वाहनाने तो पुढील प्रवास करणार होता. त्यावेळी त्यास एका मोटारसायकल वरील तीन युवकांनी सातारा बस स्थानकात सोडतो असे सांगितले. रात्रीची वेळ असल्याने व वाहन मिळत नसल्याने तो इसम त्यांचे सोबत विश्वास ठेवून त्यांच्या
मोटरसायकलवर बसला.
मोटरसायकल सुरू करून त्यास त्या युवकांनी कृष्णा नगर येथील एका मोकळ्या जागेत घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यास मारहाण करून त्याचेकडील मोबाईल व रोख दहा हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले . त्यानंतर ते लुटमार करणारे युवक पळून गेले . ज्या इसमास लुटले गेले तो इसम मदतीसाठी प्रमुख रस्त्यावर आला. त्यावेळी वेळीच रात्र गस्तीचे पोलीसांची पाहिले आणि घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्याने दिलेल्या वर्णनावरून पोलीसांनी संशयितांचा पेट्रोलिंग
दरम्यान शोध घेतला.
त्यावेळी मिळालेल्या वर्णनावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असले बाबत पोलिसांना सांगितले. त्यांचेकडून आणखीन एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाल्याने पोलीसांनी
तात्काळ त्या युवकाचा शोध घेवून त्यास देखील ताब्यात घेतले . त्यांचेकडून लुटमार केलेला मोबाईल व रोख रक्कम गुन्हयात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. सातारा शहरा व परिसरात वाढत्या बेरोजगारी तसेच व्यसन आणि पैशाच्या लोभापाई गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये आता अल्पवयीन मुलांचा समावेश चिंतेची बाब ठरली आहे.

सदरची कारवाई सातारा पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख, अप्पर पोलीस
अधिक्षक,डॉ.श्रीमती वैशाली कडुकर उपविभागिय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे,स.पो.नि. श्री.शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो. हवा. निलेश यादव, सुजीत भोसले,निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो. कॉ. दिपक ताटे, पो.कॉ. विठ्ठल सुर्वसे, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम होमगार्ड सुळ यांनी केलेली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

_________________________________
फोटो- साताऱ्यात रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या आरोपी जीवन गायकवाड याला अटक करताना पोलीस

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button