ताज्या घडामोडी

कणेरी मठ:-सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये भारतातील पहिले न्युरो मायक्रोस्कोप यंत्रणा कार्यरत.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये भारतातील पहिले न्युरो मायक्रोस्कोप यंत्रणा कार्यरत.

कणेरी मठ दि: मानवता भावनेतून मानवाच्या सेवेसाठी झटत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथील
सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा विक्रम नोंदवले आहे. अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांच्या शुभहस्ते झाले.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात हा सोहळा पार पडला.

कणेरी मठावरपूर्वी महा शिवरात्रीला दर्शनाला ग्रामीण भाविक येत होते. आता देशभरातून लाखो लोकांची पाऊले येत आहेत. परमपूज्य स्वामीजींचे कार्य देशभरात विस्तारलेले आहे, अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड दिल्यामुळे मठ सामाजिक कार्यासाठी अधिक ओळखला जातो. असे स्पष्ट करून आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, परमपूज्य कार्ड सिद्धेश्वर स्वामीजींच्या सारख्या कर्मयोगी संतांचे मार्गदर्शन लाभले. राज्यभरात कार्याचा आदर्श घेतला जात आहे. स्वामीजींच्या सामाजिक कार्यात आम्हाला सहभागी होऊन सेवा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, गेली १५ वर्षाच्या सिद्धगिरी हॉस्पिटलची वाटचाल सुरु असून धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये मुंबई ते बेंगलोर दरम्यान सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध करून देणारे हे प्रमुख हॉस्पिटल आहे. आणि आता या उपकरणाचे भारतातील पहिली स्थापना कणेरी ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात होत आहे. या उपकरणामुळे कमी वेळात आणि सहजपणे मेंदूवरील शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे. अंदाजे साडेतीन कोटी रुपये किमतीच्या या मायक्रोस्कोप मध्ये ऑपरेटिंग सर्जन आणि त्यांचे सहाय्यक यांना एकाच वेळी मायक्रोस्कोप पाहणे शक्य होणार आहे.
सिद्धगिरी हॉस्पिटल येथे निरो या प्रणाली सोबतच न्यूरो नेवीगेशन सिस्टम, न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम आणि अत्याधुनिक न्यूरो मशीन कार्यरत आहेत. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारी वैद्यकीय पथक या सुविधा ना नफा ना तोटा या तत्त्वावर वाजवी दरात रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. तरी संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू व गरीब रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आलेले आहे .

यावेळी सिद्धगिरी मठावर भरविण्यात आलेल्या पशु प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार प्रकाश आबीटकर यांची हस्ते संपन्न झाले.

प्रास्ताविक विश्वस्त उदय सावंत यांनी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गोकुळ दुध संघ संचालक श्री. नंदकुमार ढेगे, विवेकराव पाटील, जालंदर पाटील, शरद सावंत, राजन पाठारे, संतोष पाटील, बाळकृष्ण विचारे, डॉ.वर्षा पाटील, डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ. तनिष पाटील, डॉ. शीतल गवळी, डॉ. भाग्यश्री पालकर, विक्रम पाटील, विवेक सिद्ध, संजय पाटील, डॉ. संदीप पाटील, बापू कोंडेकर, माणिक पाटील चुयेकर, नामदेव बामणे, दिवाकर पाटील यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

————————————–
फोटो काढ सिद्धेश्वर हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक यंत्रणेचा लोकार्पण सोहळा ( छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button