कोरेगाव:-सोळशी येथे शनैश्र्वर ट्रस्टच्यावतीने शनि अमावस्या उत्साहात.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सोळशी येथे शनैश्र्वर ट्रस्टच्यावतीने शनि अमावस्या उत्साहात.
तीर्थक्षेत्र श्री सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्या माध्यमातून शनि अमावास्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता श्री शनैश्वर देवाच्यामूर्तीस बावन्न पात्री लघु रूदाभिषेक शनिभकतांनी घातला.
पहाटे सहा वाजता धार्मिक परंपरा नुसार नऊ ग्रह शांती होम हवन करण्यात आले.
साडेसाती, शनिमहादशा आदी असणाऱ्या अनेक भाविकांनी या धार्मिक अनुष्ठानात सहभाग घेतला.
श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट माध्यमातून या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे दिवसभर शनिअमावस्या निमित्ताने विशेष महाप्रसादाचे आयोजन केले होते. या संधीचा सातारा पुणे सांगलीजिल्ह्य़ातील भक्तांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या विचार बदला नशीब बदलेन वैचारिक सामाजिक धार्मिक प्रवचनाला महिला पुरूष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. थंडीच्या दिवसात गोरगरिबांना, भक्तांना चादर वाटप देवस्थानच्या माध्यमातून करण्यात आले.