पुसेसावळी:-प्राथमिक शाळा टिकली तरच सामान्यांना शिक्षण मिळेल -भास्करराव पेरे पाटील.
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विकास पवार कराड तालुका सचिव
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्राथमिक शाळा टिकली तरच सामान्यांना शिक्षण मिळेल -भास्करराव पेरे पाटील.
पुसेसावळी – जिल्हा परिषद केंद्र शाळा कळंबीचा शताब्दी महोत्सव सकाळी शाळेचे पूजन गुढी उभारून प्रारंभ झाला.सकाळी सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ महिला यांची ग्रंथ दिंडी काढली यावेळी संविधान ज्ञानेश्वरी, भगवदगीता, श्यामची आई, अंग्निपंख अश्या सर्वसमावेशक ग्रंथ पालखीत ठेवून लेझीम व झाजपथकाच्या तालावर ग्रंथदिंडीचे पूजन महिलांनी केले….. त्यानंतर शाळेच्या चित्रप्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन यांचे उदघाटन मा पेरे पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकसात शाळा महत्वाची आहे शाळेतुन सुजाण नागरिक निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.शाळेत आणि गावात झाडें लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शाळेने रबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले…. यावेळी खटाव च्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, चंद्रकांत सुतार, धनाजी पवार व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक,विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी केंद्र समूहातील शिक्षक उपस्थित होते..माजी शिक्षकांना यावेळी सन्मापत्र सोनाली विभुते यांच्या हस्ते देण्यात आले.. शिक्षण क्षेत्रातील खटाव पॅटर्न निर्माण करून जिल्हा परिषदेतील विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी प्राथमिक शाळांनी उपयोजनात्मक शिक्षण देन्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून तालुक्यातील शाळांमधून तसा प्रयत्न चालू आहे बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात कळंबी शाळेच्या जिल्हा स्तरावरील क्रीडास्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सौ. विभुते यांच्या हस्ते करण्यात आले. चौकट यावेळी शाळेस ढोले कुटुंबियांकडून दिलेल्या स्वागत कमानीचे व झोपळ्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.. चित्र प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनास लोकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती ……. चौकट 2 पाच ते सहा पिढ्याचा यावेळी गुरू शिष्यांचे भेटीची अभूतपूर्व सोहळा यावेळी सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवला.. या वेळी मुख्याध्यापक श्री धनाजी थोरवे यांनी सांगितले कि कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मदत केली या मदतीतून शाळेसाठी एक स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन अभ्यासिकेची सुरुवात केली जाणार आहे..