ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे- पानशेत येथे माध्यमिक विद्यालयास ७५० पुस्तकांचे ग्रंथालय भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर मावळ:-9960044802

मुख्य संपादक:- प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकूर मावळ:-9960044802.

पुणे- पानशेत येथे माध्यमिक विद्यालयास ७५० पुस्तकांचे ग्रंथालय भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा.

*सेवा इंटरनॅशनल अक्षर भारतीचा स्तुत्य उपक्रम.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सेवा इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट रोजी पानशेत येथे श्री शिवाजी वीर बाजी पासलकर माध्यमिक विद्यालय पानशेत येथे विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सेवा इंटरनॅशनल अक्षर भारती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ४०-५० हजार रुपये किंमतीची ७५० पुस्तकं भेट देउन अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कथा, कादंबरी, गोष्टी, ओरीगामी, समाजसुधारकांची आत्मचरित्र, ऐतिहासिक तसेच गणित आणि विज्ञानाशी निगडीत पुस्तकांचा यांमध्ये समावेश आहे. आज पर्यंत संपूर्ण भारतामध्ये तेरा विविध राज्यांमध्ये पंधराशे पेक्षा जास्त ग्रंथालयांचे वाटप करण्यात आले आहे.आणि संगणकीय युगामध्ये संगणकासोबतच पुस्तकांनाही तितकेच महत्त्व आहे, म्हणुन स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याने ७५० इतकी पुस्तकं देत असल्याचे अक्षर भारती संस्थेचे समन्वयक धर्मेंद्र ठाकर यांनी सांगितले ते बोलत असताना ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या गोष्टीही विद्यार्थ्यांना सांगितल्या. तसेच १५ ऑगस्ट या दिवशी चॉकलेट बिस्कीट देउन ती खाली की दुसर्‍याच दिवशी विसरूनही जातात पण वाचलेली पुस्तकं आयुष्यभर लक्षात राहतात म्हणुन पुस्तकं देऊन ज्ञानात वाढ करणे योग्य असल्याने आम्ही पुस्तकांचे वाटप करत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्या शिंदे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी केले. यावेळी अक्षर भारती संस्थेचे समन्वयक धर्मेंद्र ठाकर, शिवाजी निम्हण, भरत आडकर, पल्लवी शेवाणे, शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी विद्या शिंदे, शालिनी डींबरे, मेघा पाटील, व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button