ताज्या घडामोडी

दहिवडी:-ढाकणी (तुपेशेत) मंजूर बंधारा सुरू करणे बाबत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यता प्राप्त )

ढाकणी (तुपेशेत) मंजूर बंधारा सुरू करणे बाबत शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा.

 

दहिवडी दि: दुष्काळी माण तालुक्यामध्ये दुष्काळ नाहीसा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मृदू व जलसंधारण विभागाने २०२३रोजी ढाकणी (तुपेशेत ) नवीन सिमेंट बंधारा कामाच्या कार्यारंभ आदेश दिला. परंतु, हे काम सुरू करण्यास शेजारील गावातील काही गावगुंडांनी विरोध केल्यामुळे प्रजासत्ताक दिनी दिनांक २६ जानेवारी रोजी दलित मातंग समाजातील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य व मानवी हक्क अभियानाचे उपाध्यक्ष दिलीप रामचंद्र तुपे यांनी दिली आहे.
ढाकणी (तुपेशेत) या ठिकाणी दलित समाजातील मातंगांसोबत धनगर मराठा वंजारी समाजाची शेत जमीन आहे. या शेत जमिनीला शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी जलसंधारण विभागाने सिमेंट बंधारा मंजूर केला. कार्यारंभ आदेशानुसार बंधारा बांधण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी यंत्रणा पाठवली होती. त्या ठिकाणी काही गावगुंडांनी प्रचंड दहशत माजवली. सिमेंट बंधाऱ्याचे काम करू दिले नाही.
ढाकणी गावातील गरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली .हे सिमेंट बंधाऱ्याचे काम न झाल्यामुळे सुमारे २५ एकर शेती पाण्याविना पडून राहिली. अखेर काही शेतकऱ्यांनी ऊस ज्वारी बाजरी व फळबाग लागवडीसाठी पाण्याची स्वतः व्यवस्था करून शेती पिकाला जीवदान दिले. काम बंद पडल्यामुळे दलित शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी संबंधित शेतकरी आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या परिसरात जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष वेधून हा प्रश्न सामंजसपणाने सोडवावा अशी मागणी होऊ लागलेली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button