ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा पालकमंत्री बदलण्याची भाजप गोटातून मागणी.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त )

सातारा जिल्हा पालकमंत्री बदलण्याची भाजप गोटातून मागणी.

सातारा दि: सातारा जिल्ह्यातील सर्व समाजातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेले

कार्यकर्ते आहोत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण माता सावित्रीबाई फुले, समर्थ रामदास स्वामी, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा भूमीने देशाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलेला आहे. हिमालायाच्या रक्षणासाठी सह्याद्री
धावून आला. असे राजकीय वर्णन झालेल्या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पर्यटन, खाण, माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री ना. शंभुराज देसाई साहेब यांची निवड झाली.
आणि सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली.

त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची मागणी भाजप गोटातून झाल्याने खळबळ माजली आहे.सातारा जिल्ह्यामध्ये लोकशाहीच्या पध्दतीने झालेल्या निवडणुकीत महायुतीने विनासभेच्या आठ जागेंवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केलेले आहे. याची साक्ष म्हणजेच भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सात आमदारांनी वाड्यावर जाऊन भेट घेऊन त्यांचे आभार मानलेले आहेत.
अशा या सातारा जिल्ह्यात लोकांच्या मनामध्ये पालकमंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पालकमंत्री मानलेले आहे.परंतू, महायुती म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्री. देसाई साहेब यांची निवड नाही तर नियुक्ती झालेली आहे. हे सातारकरांना मान्य नसल्यामुळे व महाराष्ट्रात रायगड जिल्हा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे. त्याच धर्तीवर साताराला ही
पालकमंत्री पदाला स्थगिती देऊन झालेला अन्याय दूर करावा. सातारकरांच्या लोक भावनेची कदर करावी. अशा मागणीचे निवेदन केंद्रीय भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. निवेदनावर भाजप युवा मोर्चा सरचिटणीस व महामंत्री अमोल कांबळे भाजपचे माजी सातारा शहराध्यक्ष व नगरसेवक सुनील काळेकर यांच्यासह मान्यवरांच्या निवेदनावर सह्या असल्याची माहिती श्री कांबळे व श्री काळेकर यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्याचे नियुक्ती केलेले शिवसेनेचे पालकमंत्री श्री. देसाई साहेब यांच्याबद्दल कोणताही वैयक्तिक आकास नाही, व्देष भावना नाही. परंतू, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळामध्ये व विकास कामामध्ये सामान्य माणसांना डोळ्यापुढे ठेऊन केलेल्याकामाचे चीज झालेली नाही. असे भाजप सर्व कार्यकर्त्याची भावना तीव्र झालेली आहे. त्यामुळे सातारा पालकमंत्री पदी महाराष्ट्रात विक्रमी मताने निवडून आलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सातारामध्ये संधी मिळावी. असे महायुतीमध्ये ठरले होते. त्यामध्ये बदल झाल्यामुळे सातारकरांना महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी, आर.पी.आय. व इतर पक्षांवर अन्याय होण्याची भिती व्यक्त होत आहे.
तरी आमच्या निवेदनाचा सहानूभूतीपूर्वक विचार करुन पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सातारा जिल्हा पालकमंत्री पदावर तातडीने निवड करावी ही पुन्हा एकदा विनंती केली आहे. भाजपच्या या भूमिकेने महायुतीमधील अंतर्गत कलह चांगलाच चर्चेचा विषय झालेला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button