आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-महिला समुपदेशन केंद्रासाठी इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर:-9765698150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

महिला समुपदेशन केंद्रासाठी इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.

सातारा दि.20 (जिमाका) : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महिला समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तरी इच्छूक स्वयंसेवी संस्थांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत.
इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज, संस्थेची संक्षिप्त माहिती, संस्थेच्या योजना व कार्याबाबतचा मागील 3 वर्षाचा वर्षनिहाय वार्षिक अहवाल, संस्थेचा मागील 3 वर्षाचा सनदी लेखपालांची स्वाक्षरी असलेला वर्षनिहाय लेखापरीक्षण अहवाल, संस्थेने समुपदेशनाचे कार्य केल्याबाबतचा कार्याचा स्वतंत्र अहवाल, सांख्यिकी माहितीसह. संस्थेचे मागील 3 महिन्याचे महिना निहाय बँक स्टेटमेंट, संस्था नोंदणी अधिनियम 1860 आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती जोडाव्यात. संस्थेची घटना व नियमावली (घटनेत महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा) ची साक्षांकित प्रत. कर्मचारी वर्गाचे शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात. संस्थेने वेळोवेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची छायाचित्र, कागदपत्रे, वृत्तपत्रातील कात्रणे जोडावीत. संस्थेच्या कार्यरत पदाधिकारी व कार्यकारणीची नावे, पत्ते, व्यवसाय व दूरध्वनी क्रमांकासह यादी जोडावी. संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत तसेच कोणीही सदस्य शासकीय सेवतेत नाहीत याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबाबत (अध्यक्ष व सचिव) उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे विना दुराचार प्रमाणपत्र. संस्थेच्या नावाने संस्थेबाबत जनसामान्यांच्या तक्रारी नाहीत, संस्थेबाबत गैरव्यवहाराच्या तक्रारी नाही, तसेच संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही याबाबत जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र तसेच परिपूर्णच प्रस्ताव स्वीकारले जातील अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही महिला व बाल विकास कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button