खटाव:-जिल्हा परिषद शाळा कळंबी यांचा नवदुर्गेच्या कन्या रूपाचे उत्साहात पूजन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1) जिल्हा परिषद शाळा कळंबी यांचा नवदुर्गेच्या कन्या रूपाचे उत्साहात पूजन.

*कळंबी( पुसेसावळी ):-* नवरात्रीचे महत्व, दुर्गेची रूपे घटस्थापना याबाबतचे वैज्ञानिक माहिती आपल्या कृषिप्रधान देशातील भावी पिढीला समजावी तसेच स्त्रीला देवता मानणाऱ्या संस्कृतीचे आणि स्त्रियाचा आदर समाजात वाढावा या हेतूने नवदुर्गेच्या कन्या रूपाचे पूजन व्हावे यासाठी दुर्गाष्टमी चे औचित्य साधून केंद्रशाळा कळंबी येथे आज कन्यापूजन घेण्यात आले होते. यावेळी गावातील महिला, पालक ग्रामस्थ उपस्थित होते.मुलींचे पूजन करून त्यांना औक्षण केले. यावेळी त्यांना शालोपयोगी साहित्याचे व खाऊंचे वाटप करण्यात आले. घटस्थापना यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे घाटाभोंवती जे धान्य पेरतो त्याच्या बिजांकुरणाची क्षमता तपासणे व त्यातील चांगले धान्य शेतात पेरून त्यापासून जास्त उत्पादन वाढविणे हा कृषिप्रधान समाजाचा हेतू यावेळी मुलांना समजावून देण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविका सगरे मॅडम, शैला घाडगे, संदीप काळे, सतीश काळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपस्थित महिलांनी भोंडल्याची गाणी म्हणून मुलांना दाखवली.राजेंद्र खोपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
2) गोविंद श्वेत क्रांतीचे दुग्धव्यवसायात मोलाचे योगदान: संतराम जाधव.

गिरवी( फलटण ):-
गिरवी पंचक्रोशीतील दुग्धव्यवसायात गोविंद उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद श्वेत क्रांतीचे मोलाचे योगदान आहे,असे गौरव उद्गार गिरवी गावातील जेष्ठ नागरिक दुग्ध उत्पादक व्यवसायीक संतराम जाधव यांनी दसरा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीफळ वाढवताना काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व दुध उत्पादक शेतकरी अनिलकुमार कदम होते.
यावेळी प्रास्ताविक गोविंद श्वेत क्रांतीचे गिरवी येथील व्यवस्थापक सचिन कदम यांनी केले आभारप्रदर्शन गोविंद श्वेत क्रांतीचे कर्मचारी सुमित लोखंडे यांनी केले.सुत्रसंचालन गोविंद श्वेत क्रांतीचे वाहतूक व्यवस्थापक विवेक पवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी गोविंद श्वेत क्रांतीचे दुध उत्पादक शेतकरी शरद कदम, राजेंद्र कदम,रामभाऊ कदम, अनिल निकाळजे, संतराम जाधव,दुलेभाई मणेर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




