ताज्या घडामोडी

वैजापूर येथे आभार संवाद मेळावा संपन्न.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

RPS STAR NEWS

वैजापूर येथे आभार संवाद मेळावा संपन्न.

वैजापूर येथे आभार संवाद मेळाव्यात तालुक्यातील जनसमुदायासोबत संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,नागरिक व मतदार उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते तथा तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती.ती आज या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर झाली.

एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी जनतेने कायम साथ दिली आहे.आपले राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे ते कोणीही हलवू शकत नाही. काहीही झाले तरी जनता आपल्याच सोबत आहे याची खात्री आहे.आपण मागील काही वर्षांपासून वैजापूरची ओळख बदलली आहे.आपण सुसंस्कृत व संयमी बनवला. सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकास कामे केली. यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केला नाही. मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी विविध प्रकारे जनतेच्या मनात विष पेरले.आता मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे.लढणे आपल्या रक्तात आहे.त्यामुळे आता पुन्हा नव्या उभारीने जनतेत जाणार आहे. तालुक्यातील जनतेवर कार्यकर्त्यांवर व सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण कधीही सहन करणार नाही. यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही.पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद व मनभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे.आपण तयार केलेला सुसंस्कृत वैजापूर व त्याचा विकास ही प्रत्येकाचीच आता जबाबदारी आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button