क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-फलटणमध्ये सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या फ्लॅटवर धाडसी दरोडा,,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

फलटणमध्ये सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांच्या फ्लॅटवर धाडसी दरोडा,,,,
पोलीस यंत्रणा तपासाला वेग
फलटण दि: फलटण येथील नामांकित सहकारी बँकेचे व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री हरिभाऊ नामदेव खरात वय ६० रा. फ्लॅट नंबर ६, नीलकमल अपार्टमेंट, शिवाजीनगर, फलटण ता. फलटण जिल्हा सातारा यांच्या घरी दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच चोरट्याने धाडसी दरोडा टाकून सोन्याचे दागिने रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरून घेवून गेले.या धाडसी दरोड्याने फलटण परिसरात घबराट पसरली असली तरी तपासासाठी फलटण पोलीस सज्ज झालेले आहेत.
याबाबत माहिती अशी की फलटण येथील एका नामांकित सहकारी बँकेतून सेवानिवृत्त झालेले व्यवस्थापक हरिभाऊ खरात व त्यांची पत्नी आरोग्य विभागातील कर्मचारी सौ सुनीता खरात हे कुटुंबीय नीलकमल अपार्टमेंट मध्ये राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी माण तालुक्यातील मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय सेवा बजावण्यासाठी सौ. सुनीता हरिभाऊ खरात या त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या शासकीय निवासस्थानी होत्या. त्यानंतर त्या शासकीय सेवा बजावत असताना बुधवारी सकाळी काही फलटणच्या रहिवाशांनी त्यांना दूरध्वनी द्वारे आपले घर उघडे असल्याचे सांगितले. तसेच दरोडा पडण्याची शक्यता व्यक्त केली.
त्यामुळे तातडीने बुधवारी सकाळी सुनीता खरात व त्यांचे पती हरिभाऊ खरात हे खाजगी वाहनातून तातडीने मलवडी येथून निघाले व सकाळी दहा वाजता फलटण या ठिकाणी पोहचले. घरामध्ये कपाट तोडून जीवनावश्यक तसेच मौल्यवान साहित्य गायब झाल्याचे दिसून आले. दोघे वयोवृद्ध असल्याने त्यांना मानसिक धक्का बसला होता. अखेर आजूबाजूच्या रहिवाशांनी त्यांना धीर व दिलासा दिला. त्यांनी तातडीने फलटण शहर पोलीस ठाण्यात भाव घेतली. त्या ठिकाणी पोलीस हवालदार काकडे यांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे तपास करत आहेत.
या धाडसी दरोड्यांमध्ये सोन्याची दागिने व रोख रक्कम दोन लाख पन्नास हजार तसेच मौल्यवान घड्याळ, चांदीची दागिने असा मिळून सुमारे आठ ते साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची फिर्याद देण्यात आलेली आहे.
सदर कुटुंब हे दोघे नोकरी करत असून श्री हरिभाऊ खरात हे नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. मुलीचा विवाह ठरलेला असून साखरपुडा झाला होता. आणि मुलीच्या लग्नासाठी त्यांनी बँकेतून पैसे काढले होते. त्यामुळे या घटनेमुळे ते आता मानसिक रित्या खचलेल्या असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आलेले आहे. फलटण पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश व फलटण शहर अध्यक्ष सागर लोंढे यांनी केलेले आहे.

————————————————–
फोटो – फलटण येथील दरोडा फोटो

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button