वाई:-क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यातून विदयार्थ्यांनी देशभक्तीची प्रेरणा घ्यावी -प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई दि. 14
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यातून विदयार्थ्यांनी देशभक्तीची प्रेरणा घ्यावी
-प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले. किसन वीर महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत इतिहास विभाग, एनएसएस विभाग आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने ‘ 9 ऑगस्ट क्रांती दिन ‘ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व निमंत्रित वक्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सी. एस. कांबळे, एनसीसीचे प्रमुख कॅप्टन डॉ. समीर पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार डॉ. आनंद घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. मोरे म्हणाले की, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्यावर वारकरी संप्रदाय, म. फुले यांच्या सत्यशोधक समाज, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव होता. बहुजन समाजाच्या अधोगतीचे कारण समजल्यावर सामाजिक सुधारणा कार्यात पुढाकार घेऊन समाजातील अज्ञान,अनिष्ट प्रथा, चालीरिती दूर करण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत केला. पुढील काळात सरकारी नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.
१९२० ते १९४२ च्या दरम्यान सुमारे आठ ते दहा वेळा तुरुंगातवास भोगला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर १९५७ मध्ये उत्तर सातारा लोकसभेचे पहिले खासदार, संसदेत मराठीत आपले मत मांडणारे पहिले खासदार, १९६७ मध्ये कम्युनिष्ठ पक्षाचे उमेदवार म्हणून बीड मतदारसंघातून लोकसभेत विजयी होऊन संसदेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी समाजकारणात भरीव योगदान दिले. विशेषत: सरकारी सेवेत तलाठी म्हणून कार्यरत असताना महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून समाज सेवा, देशसेवेत स्वतःला झोकून दिले. त्यांचे स्वातंत्र्यचळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीबरोबरच बहुजन समाज, उपेक्षित-वंचित गोरगरीबासाठी लढणारा नेता म्हणून त्यांचे कार्य खूप महत्वाचे आहे. याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवावी असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, आजचा विद्यार्थी निराश, हताश अवस्थेत असलेला दिसून येतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नवचैतन्य, राष्ट्रप्रेम प्रज्वलित व्हावी. त्यातून एक राष्ट्रीय, सामाजिक व राजकीय भान असलेले सूजाण नागरिक घडावेत, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
इतिहास विभागप्रमुख डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. सुमंत सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार श्री. विनायक कांबळे यांनी मानले. तर सूत्रसंचालन स्वयंसेवक दयानंद खरात यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभाग, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात बहुसंख्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.