वाई, ता. १३ नशेऐवजी करियरची निवड करा – मा.जितेंद्र शहाणे किसन वीर महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई, ता. १३
नशेऐवजी करियरची निवड करा
– मा.जितेंद्र शहाणे
किसन वीर महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान.
आजची तरुण पिढी अॉनलाईन गेम आणि नशेच्या विळख्यामध्ये अडकल्याचे निदर्शनास आले आहे. खरेतर तरुणांनी नशेऐवजी करियरची निवड करायला हवी, असे प्रतिपादन वाई येथील पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले.
‘नशामुक्त भारत अभियान’ या अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार व शिवाजी विद्यापीठाच्या आदेशान्वये किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समिती आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, संयोजक कॅप्टन डॉ.समीर पवार यांची उपस्थिती होती.
जितेंद्र शहाणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतः नशेपासून दूर राहून आपला मित्र-परिवार, नातेवाईक, शेजारी-पाजारी यांनाही नशेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे व आपल्या देशाला सक्षम व बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.
सहायक पोलिस निरीक्षक अमोल गवळी म्हणाले, व्यसनामुळे स्वतःबरोबर कुटुंबाचाही -हास होतो. त्यांनी आपल्या मनोगतात व्यसनाच्या विविध प्रकारांची माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे म्हणाले, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या पाशात गुरफटलेला आहे. वाढती व्यसनाधीनता ही आपल्या देशासमोरील मोठी समस्या आहे. या पाशातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडून स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यावे.
कॅप्टन डॉ.समीर पवार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्युनिअर अंडर ऑफिसर वृषाली शिंदे हिने आभार मानले. कॅडेट निर्मिती मांढरे व श्रावणी धनावडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संग्राम थोरात, राजेंद्र जायकर, दत्ता काळे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, एन. एस. एस. चे स्वयंसेवक, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.