वाई:-किसन वीर महाविद्यालयात झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प- प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई दि 15
किसन वीर महाविद्यालयात झाडांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प- प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने झाडांच्या सुरक्षिततेसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळावेगळा आणि संदेशपूर्ण उपक्रम प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. महाविद्यालय परिसरातील झाडांना राखी बांधून त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुषा इंगवले व डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व, हवामान संतुलनातील त्यांची भूमिका तसेच वृक्षांशी भावनिक नाते जपण्याची गरज याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवकांनी पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये नेहमी पुढाकार घ्यावा.
महाविद्यालय परिसर हिरवागार व मनोहर दिसावा यासाठी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून महाविद्यालय परिसर अतिशय सुंदर बनविला आहे.
या कार्यक्रमाला रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ. दमयंती चौधरी, श्री. अनिस मोकाशी, श्रीमती प्रतिक्षा मांढरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील विविध झाडांना राखी बांधत “झाडे आपले बंधू” मानून त्यांचे जतन करण्याची प्रतिज्ञा घेतली. “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
हा उपक्रम केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारीचेही उत्तम उदाहरण ठरला आहे.