कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-अखेर विक्रमबाबा कदम यांच्या पुढाकाराने पुसेसावळी परिसराला उरमोडीचे पाणी मिळाले : माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम.

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर

अखेर विक्रमबाबा कदम यांच्या पुढाकाराने
पुसेसावळी परिसराला उरमोडीचे पाणी मिळाले : माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम.

पुसेसावळी( प्रतिनिधी ):उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी पुसेसावळी परिसरातील दुष्काळी भागाला मिळावे पारगाव, येळीव पाझर तलाव तसेच वडगाव ज.स्वा, म्हासुर्णे, राजाचे कुर्ले, उंचीठाणे, शेनवडी, रहाटणीसह आसपासच्या 40 गावातील छोटे मोठे ओढे, नालाबांध या उरमोडीच्या पाण्याने भरून घेण्यात यावे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे साहेब तसेच सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे साहेब यांना वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक पुसेसावळी जि.प. गटाचे युवा नेते विक्रमबाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले होते.
या निवेदनासंदर्भात आ.जयकुमार गोरे भाऊ व सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी वरिष्ठ पातळीवर दूरध्वनीवरून संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा केला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने तातडीने आज उरमोडीचे पाणी दुष्काळी भागाला सोडण्याचा निर्णय घेतला ते पाणी वडी कॅनॉलमध्ये पोहोचल्यानंतर टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या वतीने जलपूजन करण्यात आले. यावेळी पुसेसावळी ग्रा.पं.माजी सदस्य अमोल कदम, चोराडेचे युवा नेते श्रीकांत पिसाळ, अनिल पिसाळ (आप्पा), रहाटणीचे बाळू आप्पा थोरात, ज्ञानेश्वर पवार, किशोर येवले, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, डी. के.बापू, पांडुरंग वाईकर, संजय शेडगे, राहुल येवले, रणजीत येवले, सचिन पिसाळ, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button