वाई:-कर्तव्य, धाडस आणि लोकसेवेचा गौरव! महेश थोरवे ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र 2026’ने सन्मानित.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कर्तव्य, धाडस आणि लोकसेवेचा गौरव! महेश थोरवे ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र 2026’ने सन्मानित.

वाई दि.२: कर्तव्यनिष्ठ सेवा, निडर धाडस आणि लोकाभिमुख कार्यशैलीच्या बळावर लक्ष्मी नगर, येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) महेश शामराव थोरवे यांना ‘प्राइड ऑफ महाराष्ट्र 2026’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील लक्ष्मी नगर, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये रुजू होताच महेश थोरवे यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप पाडली. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना त्यांनी दाखवलेली तत्परता, नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याची संवेदनशीलता आणि न्याय देण्याची ठाम भूमिका यामुळे ते सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत. प्रामाणिकपणा, निडर वृत्ती आणि सेवाभावी दृष्टिकोनामुळे ते पोलीस दलातील एक आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कामगार दिन व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे हा भव्य सन्मान सोहळा पार पडला. येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक शमाकांत शेडगे यांच्या हस्ते महेश थोरवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तृप्तीताई देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, डॉ. अंजुम बागवान तसेच संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद व उपाध्यक्ष सतीश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांचे मूळ गाव वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी येथील ग्रामस्थ, थोरवे परिवार तसेच त्यांच्या कार्यरत पोलीस स्टेशनकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थांनी भावना व्यक्त करत, “महेश थोरवे सारखे सुपुत्र आमच्या गावाला लाभले, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार काढले.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक महेश थोरवे यांनी नम्रपणे प्रतिक्रिया देताना सांगितले, “हा पुरस्कार मी माझ्या गावच्या ग्रामस्थांना आणि माझ्या कुटुंबाला समर्पित करतो.” त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




