माळेवाडी श्रीरामपूर:-विश्वकर्मा चौक नामफलकाचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण – सुतार समाजाच्या अस्मितेचा हुंकार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विश्वकर्मा चौक नामफलकाचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण – सुतार समाजाच्या अस्मितेचा हुंकार.

माळेवाडी श्रीरामपूर ( RPS स्टार न्यूज प्रतिनिधी ) संगमनेर येथे काल दि.०१/०५/२०२६ रोजी, “श्री विश्वकर्मा चौक” या चौकाच्या नामफलकाचे अनावरण संगमनेर येथे युवा आमदार मा. सत्यजीत तांबे यांच्या हस्ते, नगराध्यक्षा डॅा. सौ. मैथिलीताई तांबे, ऊपनगराध्यक्ष नूरमोहम्मद पीरमोहम्मद शेख, सर्व नगरसेवक, मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मा. विद्यानंदजी मानकर, राज्य समन्वयक विश्वकर्मीय समाज, पुणे यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला. संगमनेर येथील स्टेडियमकडून मेडीकव्हर हॅास्पीटलकडे जाणारा रस्ता अकोले बायपास रोडला जिथे छेद देतो त्या चौकाला “श्री विश्वकर्मा चौक” असे नाव देण्याचा ठराव संगमनेर नगरपरिषदेने पारित केला आहे. या चौकाचा नामफलक अनावरण करण्याचा दिमाखदार सोहळा संगमनेर नगरपरिषद, संगमनेर शहर, तालुका व अकोले येथील विश्वकर्मीय समाज यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी बोलताना आ. सत्यजीत तांबे यांनी, भगवान विश्वकर्मा हेच विश्वाचे शिल्पकार आहेत. विश्वकर्मा भगवान हे सर्वच समाजांचे असून अभियांत्रीकी, आर्कीटेक्चर, शिल्पकला या सर्व आधुनिक शाखांचे ते आद्यगुरू आहेत. संपुर्ण विश्वाची निर्मीती त्यांनी केली आहे. संगमनेर २.० या संकल्पनेत आपण लवकरच बाराबलुतेदारांच्या सन्मान करणारे एक स्मारक या ठिकाणी ऊभे करणार आहोत अशी माहीती दिली.
विद्यानंदजी मानकर यांनी बोलताना सत्यजीतदादा तांबे हे अतिशय लोकप्रिय, धडाडीचे व व्हीजन असलेले तरूण नेतृत्व असून त्यांच्या सोबत यापुर्वी काम केलेले असल्याने त्यांची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत मला माहीत आहे असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना देवीदास गोरे यांनी अतिशय कमी वेळेत, नगरपरिषदेने श्री विश्वकर्मा चौकाचे नामकरणाला मान्यता देऊन, दिमाखदार सोहळा आयोजीत केल्याबद्दल नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक व आ. सत्यजीतदादा तांबे यांचे आभार मानले.
या सोहळ्यासाठी अकोले, पुणे, नाशिक, ठाणे, अहिल्यानगर येथून मोठ्या प्रमाणात विश्वकर्मीय समाजबांधव ऊपस्थित होते.
न भुतो न भविष्यती असा ऊत्साह या कार्यक्रमात पहायला मिळाला. समाज बांधव प्रचंड संख्येने ऊपस्थित होते. ऊर्जा आणि ऊत्साह याचा संगम आणि समाजाच्या अस्मितेचा अविष्कार येथे पहावयास मिळाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. ॲड. राजू खरे यांनी सर्व ऊपस्थितांचे आभार मानले.
विश्वकर्मीय बांधवांची शिस्तबद्ध प्रचंड गर्दी व ऊत्साह हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा पतसंस्था व युवक संघटनेचे किरण वाकचौरे, स्वप्नील रोकडे, हरिश गोरे, बाबासाहेब राऊत, प्रविण रोकडे, संपत सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, राजेश वाकचौरे, कैलास क्षीरसागर, महेश सुर्यवंशी, बाजीराव वाकचौरे, महेश जानवेकर, कमलताई कदम, नामदेव गाडेकर, रमेश राजगुरू, कैलासकाका भालेराव, राजू गोरे, संतोष गोरे, विलास सुर्यवंशी, माधव सोनवणे, गोरख राऊत, ज्ञानेश्वर वाकचौरे, डी डी वाकचौरे,
विकास सोनवणे व संगमनेर-अकोले येथील सर्व समाजबांधवांनी मेहनत घेतली.
कार्यक्रम प्रचंड मोठा असल्याने प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य झाले नाही. त्यासाठी क्षमस्व.
आज एकत्र आलो तसेच यापुढेही कायम एकत्र येत राहू.
*हातात हात घेऊ या. समाज जोडत राहू यात्साह याचा संगम आणि समाजाच्या अस्मितेचा अविष्कार येथे पहावयास मिळाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. ॲड. राजू खरे यांनी सर्व ऊपस्थितांचे आभार मानले.
विश्वकर्मीय बांधवांची शिस्तबद्ध प्रचंड गर्दी व ऊत्साह हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा पतसंस्था व युवक संघटनेचे किरण वाकचौरे, स्वप्नील रोकडे, हरिश गोरे, बाबासाहेब राऊत, प्रविण रोकडे, संपत सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, राजेश वाकचौरे, कैलास क्षीरसागर, महेश सुर्यवंशी, बाजीराव वाकचौरे, महेश जानवेकर, कमलताई कदम, नामदेव गाडेकर, रमेश राजगुरू, कैलासकाका भालेराव, राजू गोरे, संतोष गोरे, विलास सुर्यवंशी, माधव सोनवणे, गोरख राऊत, ज्ञानेश्वर वाकचौरे, डी डी वाकचौरे,
विकास सोनवणे व संगमनेर-अकोले येथील सर्व समाजबांधवांनी मेहनत घेतली.
कार्यक्रम प्रचंड मोठा असल्याने प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य झाले नाही. त्यासाठी क्षमस्व.
आज एकत्र आलो तसेच यापुढेही कायम एकत्र येत राहू.
हातात हात घेऊ या. समाज जोडत राहू या.