निफाड:-दीपावलीच्या पावन पर्वावर माजी विद्यार्थी 23 वर्षाने भेटले.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक
RPS STAR NEWS
दीपावलीच्या पावन पर्वावर माजी विद्यार्थी 23 वर्षाने भेटले.
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर गोंदेगाव येथील 1999- 2000 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 23 वर्षानंतर 4 नोव्हेंबर 2024 वार सोमवार रोजी आठवणींचा सोहळा अर्थात स्नेह मेळाव्याच्या आयोजन केले.
या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक विठ्ठल बागडे सर, मंगेश आव्हाड सर, कैलास भोसले सर, विश्वनाथ शेवाळे सर व बाप्पू शेरेकर सर, मुजीब पठाण सर उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या शिक्षकांचे स्वागत केले
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आरती करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून
शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त करत आपल्या आठवणी आणि भावनांना वाट करून दिली.. शिक्षकांनी सध्याच्या काळात आपल्या पुढील आव्हाने व आपण सर्वांनी एकत्र येऊन विविध उपक्रम राबवले असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले..या कार्यक्रमात मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दिली.23 वर्षानंतर एकत्रित स्नेहभोजन घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कामी अथक मेहनत घेतली व या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आमच्या आयुष्याला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झाली असे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले..