ताज्या घडामोडी

सातारा:-या पेठेतील ठेकेदार त्या पेठेत पदयात्रेत तर घराशेजारी वेगळा प्रचार…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

या पेठेतील ठेकेदार त्या पेठेत पदयात्रेत तर घराशेजारी वेगळा प्रचार…

सातारा दि: सातारा- जावळी विधानसभा मतदार संघात एकतर्फी वाटणारी निवडणूक रंग भरणे सुरू झालेली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना प्रचाराचा अधिकार आहे. तरीही या पेठेतील ठेकेदार त्या तळेशेजारी पदयात्रेत तर त्याच्या घराशेजारी वेगळ्या चिन्हाचा प्रचार होत असल्याचे दिसून आलेले आहे. सध्या सातारा शहरामध्ये प्रमुख पेठ व शाहूपुरी, सदर बाजार, शाहूनगर , तमजाई नगर, बोगदा, गडकर अळी अशा विभागात महायुती व महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख तीन लढतीस अपक्ष उमेदवार आपापल्या कुवेतीप्रमाणे प्रचारात गुंतले आहेत. नवलाईची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवाळी सणामुळे प्रचारक थोडी विश्रांती मिळाली. आता ताजे तवाने होऊन कार्यकर्ते व उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. काहीजण आपापल्या लाडक्या उमेदवारांचा प्रामाणिकपणाने प्रचार करत आहेत. पण, या पेठतील काही ठेकेदार त्या नगरात पदयात्रेत आणि त्या ठेकेदाराच्या घराशेजारी वेगळ्या चिन्हाचा प्रचार होत असल्याचे अनेकांनी सांगितले. हेच परिवर्तनाचे चक्र पूर्ण करण्यासाठी मतदारांनी ही जागृतपणाने मतदान करावे. असे आवाहन केले जात आहे. सातारा – जावळी मतदार संघात लवकरच सामान्य मतदारांना मतदानासाठी बाहेर पडणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विकास कामे करत असताना मतदार संघातील विकास कामे वाटप करणारी पर्यायी यंत्रणा म्हणजेच कोणी टक्केवारी खाणारा भैय्या… मग, काय करेल मैया.. अशी गत काही ठेकेदारांची झालेली आहे. सध्या कोपरा सभा व पदयात्रा प्रभात फेरी आणि व्यक्तिगत गाठीभेटी यामुळे व निवडणुकीमय वातावरण निर्माण झालेले आहे. आचारसंहितेचे अंमलबजावणी काटेकोरपणाने करण्यामध्ये काहींचा कल आहे. त्यामुळे काहींना आचारसंहितेचे दुखणे अवघड बनलेले आहे. अनेकांची नाराजी दूर करून त्यांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रचार करत असताना केडर बेस पार्टी यशस्वी ठरत आहे. कारण, आपल्या भागात जास्तीत जास्त मतदान आपल्या लाडक्या उमेदवाराला व्हावे. यासाठी व्यक्तिगत पातळीवर काही प्रचारक यशस्वी ठरले तर काहीजण आपण ज्या गल्लीत, ज्या गावात राहतो त्या ऐवजी सर्वच ठिकाणी उमेदवाराच्या पुढे मागे करून आपणच प्रमुख प्रचारक असल्याचा आभास निर्माण करत आहेत. त्यांची कीव करावी वाटत आहे. असे ज्येष्ठ मतदार आपला अनुभव सांगू लागलेले आहेत. एकूणच या निवडणुकीने शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व अभ्यासपूर्ण मांडणी व चर्चा करून मतदारांना प्रभावित करणारे कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या मुद्द्यावरच काही उमेदवार मांडणी करत आहेत. व्यक्तिगत टीका टिपणी टाळली जात आहेत. यांच्या सुद्धा उल्लेख करणे गरजेचे आहे. त्याचे मतदार सुद्धा कौतुक करू लागलेले आहेत.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button