वैजापूर:-112 विधानसभा मतदारसंघातील खादगाव व गाजगाव या मतदान केंद्रांना मा.निवडणूक निरीक्षक श्री उज्वल सिंग यांनी भेट देऊन केली पाहणी.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
दिनांक 7/9/ 2024
वैजापूर:-112 विधानसभा मतदारसंघातील खादगाव व गाजगाव या मतदान केंद्रांना मा.निवडणूक निरीक्षक श्री उज्वल सिंग यांनी भेट देऊन केली पाहणी.
वैजापूर:-112 विधानसभा मतदारसंघातील खादगाव व गाजगाव या मतदान केंद्रांना मा.निवडणूक निरीक्षक श्री उज्वल सिंग यांनी भेटी देऊन पाहणी केली व भेटीदरम्यान मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयी AMF (ASSURED MINIMUM FACILITY) सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. वैजापूर तालुक्यात निवडणूक प्रक्रिया बाबत मा.श्री उज्वल सिंग हे निवडणूक निरीक्षक असून निवडणूक खर्चाच्या बाबतीत मा. श्री सोभन सूत्रधार हे निवडणूक निरीक्षक (खर्च )म्हणून लाभले आहे. मतदान दिवशी उमेदवारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे प्रशासनाने उपाययोजना केली असून वृद्ध, अपंग ,स्त्रिया यांचे करिता आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोयी सुविधा देण्यात आले आहे. निरीक्षकांच्या भेटी दरम्यान मतदान केंद्राची स्थिती, रॅम्प,लाईट व्यवस्था फर्निचर, स्वच्छतागृह यांची पाहणी केली यावेळी उपस्थित सरपंच व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर दिलेली व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी एसएसटी पथकाचे श्री गुणाजी क्षीरसागर ,नायब तहसीलदार श्री कांबळे साहेब ,तलाठी श्री कृष्णा गायके ,श्री चौकडे सर तसेच गाजगावचे तलाठी श्री बागुल साहेब व पोलीस पाटील श्री सुरेश आप्पा संगेकर मुख्याध्यापक श्री के एम बडोगे व बी एल ओ उपस्थित होते.