कोरेगाव:-ज्यांच्या पाठीशी बहीण आहे तो भाऊ कधीही अपयशी होत नाही –डॉ. सौ. अरुणाताई बर्गे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
ज्यांच्या पाठीशी बहीण आहे तो भाऊ कधीही अपयशी होत नाही
–डॉ. सौ. अरुणाताई बर्गे
कोरेगाव दि: राजकारणामध्ये काही मतभेद झाले असले तरी सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक रमेश उबाळे सारखा भाऊ कधीही लांब गेला नाही. त्यांनी सुरू केलेला प्रत्येक व्यवसाय हा भरभराटीचा नक्कीच जाईल. कारण, ज्या भावाच्या पाठीशी बहीण ताकतीने उभी आहे. तो भाऊ कधीही अपयशी होत नाही. असे आशीर्वाद डॉ. सौ .अरुणाताई बर्गे यांनी हॉटेल बैठक उद्घाघाटन प्रसंगी केले. यावेळीला कोरेगाव खटावचे शिवसेना आमदार महेश शिंदे, महाराष्ट्र स्टेट बिल्डर असोसिएशनचे चेअरमन सचिन देशमुख, सातारा बिल्डर्स यांचे चेअरमन सुधीर ठोके, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, सौ .प्रियाताई शिंदे ,सौ तृप्ती रमेश उबाळे व अजित जगताप, ंटामुक्त अध्यक्ष सोपान मच्छिंद्र, पॅनल प्रमुख किसन भाऊ सावंत, श्रीकांत बर्गे, युवा नेते जमीर भोसले, लक्ष्मण उबाळे, शामराव इंगळे चंद्रकांत उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलदार स्वभावाचे उद्योजक रमेश उबाळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सहकार्य अनेकांनी केलेले आहे. त्याचे पेक्षा जास्त सहकार्य ते करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्यवसायामध्ये यश मिळो आणि त्यांच्या बालाजी उद्योग समूहाचा वृक्ष अधिक फुलत राहो अशा शब्दात सौ .प्रियाताई महेश शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपुलकीने बोलवून मान सन्मान देणारे रमेश दादा उबाळे यांच्या व्यवसायाला निश्चितच यश मिळणार आहे. आमदार महेश शिंदे यांची त्यांना नेहमीच साथ सोबत राहील. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील हॉटेल बैठक हे महामार्गावरच असून या ठिकाणी उत्कृष्ट आस्वाद घेण्यासाठी अनेक जण येत आहेत. दर्जेदार गुणवत्ता व चव यांचे मिश्रण म्हणजे हॉटेल बैठक हे असून या ठिकाणी तृप्तीचे ढेकर देऊनच खवय्या बाहेर पडतील. असा विश्वास ग्राहक वर्गणी व्यक्त केला . या कार्यक्रमासाठी सोमनाथ शिंदे, महेश नलावडे, अजित सोनवणे, आर.डी. भोसले कोरेगाव परिसरातील ग्रामस्थ खवय्या, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्याबा उबाळे, सौ . रोहिणी उबाळे व रमेश उबाळे ,रुपेश उबाळे यांनी केले. आपल्या निवडणुकीत व्यस्त कार्यक्रम असतानाही आपल्या मागासवर्गीय बंधू रमेश उबाळेंसाठी धावून येणाऱ्या शिवसेना आ. महेश शिंदे यांच्या मनाच्या मोठेपणाचा अनेकांनी कौतुक करून त्यांना निवडणुकीत शुभेच्छा ही दिल्या. संदीप जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विजयाचा जयघोष करून हॉटेल बैठक ही वैचारिक बैठक असणाऱ्या हॉटेलच्या खाद्यपदार्थही आरोग्याची काळजी घेणारे ठरेल. असे खवय्या ग्राहकांनी सांगितले. …….