पारनेर:-सुपा परीसरातील बिबट्यांचा सहवास कायमं!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सुपा परीसरातील बिबट्यांचा सहवास कायमं!
पारनेर

( राजकुमार इकडे)
दि.१४
पारनेर तालुक्यातील सुपा परीसरात बिबट्यांचा सहवास गेल्या एक वर्षापासुन चालुच आहे रात्रीच्या वेळी बाहेर जाने अगदी धोक्याचे झाले आहे
गेली काही दिवसात वनखात्याच्या अधिकारी वर्गानी बिबट्या जेलबंध करुन घेउन जात असतांनां मधेच पिंजर्यातुन बिबट्या सुटला आणी पसार झाला .अनेक ठिकाणी पिंजरे लाऊन ही काहीच उपयोग होत नाही,अनेक वेळा बिबटे जेलबंध करुन नियोजित ठिकाणी सोडुन ही सुपा पंचक्रोशीतील बिबट्यांचा सहवास दररोज ठिकठिकाणी पहावयास मिळतो.
दि.१४ रोजी सुपा परीसरातील रूईछत्रपती येथील परीसरात खंडोबा माळ मंदीरांजवळ बारवकर मळ्याजवळ मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन घडले,
तरी सुपा पंचक्रोशीतील रांजणगाव,पिंपरीगवळी,बाबुर्डी,येथील सर्व नागरीक,शेतकरी बांधवानी सतर्क राहण्यासाठी रुईछत्रपती येथील माजी सरपंच जनार्धन दिवटे,व रांजणगाव येथील माजी सरपंच बंटीशेट साबळे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे सर्वानी सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे.




