पुणे पिंपरी:-पवनाथडी जत्रेचे उद्घाटन अति. आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते संपन्न.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पवनाथडी जत्रेचे उद्घाटन अति. आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते संपन्न.
पिंपरी, दि. 17 (शफिक शेख) :- महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित पवनाथडी जत्रेचे उद्घाटन अति. आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले.
महापालिकेच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असून महिलांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन जांभळे पाटील यांनी केले.
महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरण व्हावे यासाठी पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच यापुढेही महिलांना अशा प्रकारचे व्यासपीठ मिळावे यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील, असे जांभळे पाटील म्हणाले.
या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेल्या चित्रा वाघ यांनी आपले मत यावेळी मांडले. चूल व मूल या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन स्त्रियांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या वतीने पवनाथडीच्या निमित्ताने उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, अति. आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, रविकिरण घोडके, सहा. आयुक्त श्रीनिवास दांगट, विजयकुमार थोरात, सुहास बहाद्दरपुरे, किरण गायकवाड, मेजर उदय जरांडे, ओमप्रकाश बहिवाल, उषा उर्फ माई ढोरे, नामदेव ढाके, शंकर जगताप, राजेंद्र राजापुरे, प्रशांत शितोळे, सुरेश भोईर, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, अंबरनाथ कांबळे, हर्षल ढोरे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे, उषा मुंढे, उज्ज्वला गावडे, रंजना चिंचवडे, उषाताई भिसे, अनिल शिंदे, दिलीप धुमाळ यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार सुहास बहाद्दरपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.