ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा लोकसभेसाठी आ.शिंदे यांच्या तुतारीने रणशिंग फुंकले.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा लोकसभेसाठी आ.शिंदे यांच्या तुतारीने रणशिंग फुंकले.

सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यातून आता महायुती नंतर महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा जोर धरू लागलेली आहे. काल दुपारी आ. शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यातील प्रवेशद्वार शिरवळ या ठिकाणी आगमन झाले. या वेळेला तुतारीच्या निनादात महाविकास आघाडीने रणसिंग फुंकले .
यावेळी झालेल्या गर्दीने सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघातील सर्व निवडणूक उमेदवार जवळजवळ निश्चित झाली आहेत. मात्र महायुतीने अद्यापही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. पहिले आप… पहिले आप… करत करत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विधान परिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले. आज पुणे येथून आमदार शिंदे साताऱ्यात दाखल झाले.
तरुण वर्ग, महिला व जेष्ठ नागरिक आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिरवळ पासून जागोजागी आमदार शिंदे यांचे भव्य दिव्य स्वागत करून त्यांचा सत्कार केला. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या .त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची व चुरशीची होणार आहे. खरं म्हणजे पाहता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अर्धा डझन उमेदवार तयारीला लागलेली आहेत. त्यामध्ये प्रमुख तीन पक्ष म्हणजे महायुती महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी अशा तीन प्रमुख पक्षाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .तत्पूर्वी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे येऊन अनेक मान्यवरांची भेट घेतली. तसेच कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी गाड्यांचा ताफा व कार्यकर्त्यांची गर्दी लक्षणीय झाली होती. घोडे मैदान जवळ आल्यामुळे आता जोर बैठका काढण्यापेक्षा प्रत्यक्षात राजकीय आखाड्यातील कुस्तीतील डाव टाकण्यास सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे.
शिरवळ, पाचवड, आनेवाडी फाटा, अजंठा चौक ते कराड अशा मार्गावर अनेकांनी त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले. या वेळेला कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आमदार शशिकांत शिंदे चांगलेच भारावून गेले होते. प्रत्यक्षात कार्यकर्ते जर निवडणुकीमध्ये सक्रिय सहभागी झाले तर चमत्कार घडू शकतो. अशी आशा त्यांना वाटू लागलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र तेजस शिंदे व साहिल शिंदे याचबरोबर प्रदीप शिंदे व कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button